या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल राजेंद्र सोनवणे असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, 29 जानेवारी रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास आरोपीने तिच्या नकळत तिला स्पर्श करतानाचे व्हिडीओ काढले आणि ते थेट तिच्या मोबाईलवर पाठवले. असे अनेक व्हिडीओ आरोपीने पाठविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
advertisement
Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे, डबल संकट येतंय, हवामान विभागाचा अलर्ट
या प्रकाराबाबत महिलेने जाब विचारला असता आरोपीने फोनवरून धमकावत, तुमच्याशी असेच वागले पाहिजे, असे म्हणत अपमानास्पद आणि जातीवाचक शब्दांचा वापर करून हिनवले, असा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त मनिष कल्याणकर करत आहेत.






