नेमकं घडलं काय?
समलैंगिक संबंधातून पार्टनरचा अंत झाल्याची घटना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी मुंबईमध्ये झाली होती. या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आला आहे. 34 वर्षीय तरुण आणि 55 वर्षीय व्यक्तीचे मागील अनेक वर्षांपासून समलैंगिक संबंध होते. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी लैंगिक संबंध प्रस्थापित करत असताना 55 वर्षीय पार्टनर बेशुद्ध पडून मृत झाला. यामुळे घाबरलेल्या 34 वर्षीय पार्टनरने 55 वर्षीय पार्टनरच्या खिशातील दोन मोबाईल फोन घेऊन पसार झाला. या चोरलेल्या मोबाईल फोनमुळेच या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलेय.
advertisement
‘कधी रस्त्यात दिसली तर एकदा माझ्याकडे वळून बघू दे’, गाडी चोरासाठी सोलापूरकर तरुणाची खास कविता Video
12 वर्षांचे प्रेमसंबंध
काळबादेवी परिसरात राहणारा मृत 55 वर्षीय व्यक्ती हा अविवाहित होता. त्याच्या मालकीची दोन्ही घरे भाड्चाने देत त्यातून मिळणाऱ्या पैशातून उदरनिर्वाह व्हायचा. याच परिसरात कपडांच्या दुकानात काम करणाऱ्या 34 वर्षीय तरुणासोबत त्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे भेटीगाठी वाढत गेल्या. 12 वर्षापासून ते प्रेमसंबंधात होते. तर 34 वर्षीय तरुणाचे लग्न झाले असून त्याला मुलगा आहे.
सेलिब्रेशननं झाला अंत
'व्हॅलेंटाईन डे' निमित्ताने दोघांनीही काळबादेवीतील घरात सेलिब्रेशन केले. सायंकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये समलैंगिक संबंध सुरु असताना 55 वर्षीय पार्टनर बेशुद्ध पडला. त्याला कुठलीही वैद्यकीय मदत न करता जोडीदार पसार झाला. अखेर दोन दिवसाने त्याच इमारतीत राहणाऱ्या नातेवाईकांना त्यांचा दरवाजा उघडा दिसला. आतून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली होती. त्यांनी आतमध्ये डोकावले तेव्हा 55 वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत दिसली. घटनेची माहिती मिळताच एलटी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
मोबाईल चोरीने उघड झालं कांड
34 वर्षीय तरुणाने आपल्या पार्टनरला मोबाईल ठेवायला दिला होता. मात्र तो त्याच्या पार्टनरकडून गहाळ झाला. यावरून दोघांमध्ये वाद देखील झाले. पार्टनरने त्या बदल्यात पैसे देण्याचे कबूल केले होते. मात्र त्याला मोबाईल मिळाला नाही. त्यामुळे घटनेच्या दिवशी पार्टनरच्या अंगावर चादर टाकून दोन मोबाईल घेऊन गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. याच मोबाइलच्या आधारे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. मोबाईल चोरीने या गुन्ह्याचा उलगडा झाला आणि समलैंगिक संबंधांला वाचा फुटली.