पोलीसही झाले अचंबित..!
कोल्हापुरातील चंदगड तालुका मार्केट जिल्ह्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूची चोरी वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. ही माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यानुसार नेसरी गडहिंग्लज मार्गावर महागाव जवळ कामत ओढा या ठिकाणी दोन आलिशान मोटारी संशयास्पदरीत्या पोलिसांना आढळल्या.
advertisement
ग्राहकांकडे 35 कोटींची थकबाकी, महावितरणचा इशारा, वीजबिल भरा नाहीतर...
रविवारी मध्यरात्री नाकाबंदी करून ही कारवाई करण्यात आली. त्यापैकी एका मोटारीवर लाल दिवा लावल्याचे दिसून आले. त्यानुसार मोटार येथील दोघांकडे भरारी पथकाने चौकशी केली. या मोटारीमध्ये नितीन ढेरे हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शासकीय गणवेशात मोटारीत चालक म्हणून पुढच्या सीटवर बसला होता आणि निवृत्त जवान शिवाजी धायगुडे हा त्याच्या शेजारच्या सीटवर बसला होता.
पोलिसांनी या दोघांची चौकशी करून मोटारीची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे गोवा बनावटीचे दारूचे एकूण 36 बॉक्स निदर्शनास आले. त्यामध्ये विविध कंपन्यांच्या महागड्या दारूंचाही समावेश होता. हा दारूचासाठा कोणाकडून आणि कोणासाठी आणण्यात येत होता याची सध्या चौकशी सुरू आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिली.
आजपर्यंत गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीचे अनेक प्रकरणांवर पोलिसांनी कारवाई केली. मात्र अशा धाडसी आणि अजब प्रकारामुळे पोलीसही थोड्या वेळासाठी अचंबित झाले. दरम्यान स्थानिकांच्या म्हणण्यानुसार नितीन ढेरे हा शासकीय गणवेश घालून लोकांच्यात वावरत असतो. दरम्यान या जप्त केलेल्या मोटारी आणि नितीन ढेरे याच्या या प्रकरणावर पोलीस कशा प्रकारची कारवाई करणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.






