TRENDING:

हनिमूनला गेलं कपल, येताना पकडली ट्रेन, नवऱ्यानं तिला एकांतात नेलं आणि... बायकोनं सांगितली थरारक घटना

Last Updated:

एक धक्कादायक कहाणी समोर आली आहे जी प्रेम, फसवणूक आणि जीवघेण्या कटकारस्थानाची आहे. ही कहाणी आहे खुशबू आणि शंकरची.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजकाल प्रेमात पडणं, घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करणं सामान्य झालंय. पण कधी-कधी ही प्रेमकहाणी इतकी भयंकर वळण घेते, की ऐकून अंगावर शहारे येतात. अशा अनेक कहाण्या मागच्या काही दिवसांमध्ये समोर आल्या आहेत, ज्या खरोखरंच हादरवून टाकणाऱ्या आहेत.
AI Generated Photo
AI Generated Photo
advertisement

अशीच एक धक्कादायक कहाणी समोर आली आहे जी प्रेम, फसवणूक आणि जीवघेण्या कटकारस्थानाची आहे. ही कहाणी आहे खुशबू आणि शंकरची.

देवरियामधील खुशबू हिला गोरखपूरच्या शंकरशी प्रेम झालं. दोघं एकमेकांच्या प्रेमात इतके गुंतले की घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर सगळं सुरळीत सुरू होतं. शंकरने तिला हनिमूनला जायचं सुचवलं आणि ती खूश होऊन तयार झाली.

advertisement

हनिमूनचा बहाणा आणि धोका

दोघं मिळून झारखंडला गेले. तिथे धार्मिक स्थळं, पर्यटन स्थळं सगळीकडे फिरले, मजा केली. वाटत होतं, खरंच आयुष्य सुंदर आहे आणि दोघांनी लग्न करणं हा एक चांगला निर्णय आहे. पण शंकरच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू होतं…

परत येताना दोघांनी बनारस-बरकाकाना पॅसेंजर ट्रेन पकडली. रात्रीचा वेळ होता. शंकरने गोडगोड बोलून खुशबूला ट्रेनच्या दरवाज्यापाशी नेलं आणि अचानक तिला धक्का मारण्याचा प्रयत्न केला! खुशबूने त्याचे पाय पकडले, विनवणी केली "शंकर, मला मारू नको!" पण त्यानं ऐकलंच नाही. त्यानं तिला जोरात ढकललं आणि खुशबू चालत्या ट्रेनमधून खाली पडली.

advertisement

ट्रेनमधून खूशबू थेट एका नाल्यात जाऊन पडली. ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. छातीच्या हाडांना आणि पायांना गंभीर इजा झाली. गावकऱ्यांनी तिला पाहिलं आणि RPF ला माहिती दिली. पोलिसांनी वेळ न घालवता तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

हा सगळा प्रकार सांगण्यासाठी नशिबानं खूशबु जिवंत होती. तिनं शंकरचा हा डाव पोलिसांना सांगितला. सध्या पोलिस शंकरचा शोध घेत आहेत. लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे. शंकरनं प्रेम विवाह करुन देखील खुशबुसोबत तो असा का वागला? या मागचं कारण समोर आलेलं नाही. पण हे प्रकरण खरोखरच धक्कादायक आहे आणि एखाद्याच्या मनात धडकी भरवणारं आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
हनिमूनला गेलं कपल, येताना पकडली ट्रेन, नवऱ्यानं तिला एकांतात नेलं आणि... बायकोनं सांगितली थरारक घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल