TRENDING:

37 वर्षीय हवालदाराचं टोकाचं पाऊल, राहत्या घरातच सगळं संपवलं, सोलापूर पोलिसांत खळबळ

Last Updated:

Solapur News: काही दिवसांपूर्वीच सोलापुरात पोलीस पत्नीने आत्महत्या केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली होती. आता पोलीस हवालदाराने टोकाचं पाऊल उचललं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर - पोलीस पत्नीचे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना सोलापूर शहर पोलीस दलात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूर शहर मोटार परिवहन विभागात कार्यरत असलेल्या एका 37 वर्षीय अविवाहित पोलीस हवालदाराने जीवन संपवले. घरातील छताच्या पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरेश चंदप्पा कोळी असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
37 वर्षीय हवालदाराचं टोकाचं पाऊल, राहत्या घरातच सगळं संपवलं, सोलापूर पोलिसांत खळबळ
37 वर्षीय हवालदाराचं टोकाचं पाऊल, राहत्या घरातच सगळं संपवलं, सोलापूर पोलिसांत खळबळ
advertisement

सुरेश कोळी हे शहर मोटार परिवहन विभागात कार्यरत होते. ते मूळचे अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथील असून नोकरीनिमित्त सोलापुरातील कर्णिकनगर परिसरात वास्तव्यास होते. सोमवारी सकाळी 10 वाजता राहत्या घरात त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. याबाबत नातेवाईक शंकर शिवलिंगप्पा आयसार यांनी पोलिसांना माहिती दिली.

सातवीतला प्रथमेश विनवत होता, पण कंडक्टरनं ऐकलं नाही, अर्ध्या वाटेत..., सोलापूरच्या घटनेनं संताप

advertisement

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार डी.के. डोके हे घटनास्थळी पोहोचले. नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचारी रुग्णालयात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दाखल केला.

View More

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
संक्रांतीच्या आधी भोगी का साजरी करतात? भोगीच्या भाजीची परंपरा काय? Video
सर्व पहा

मृत सुरेश चंदप्पा कोळी कर्णिक नगर या ठिकाणी एकटेच भाड्याच्या खोलीत राहात होते. त्यांचे कुटुंबीय हे अक्कलकोट येथील हैद्रा येथे राहण्यास होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, 1 भाऊ आणि 3 बहिणी असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
37 वर्षीय हवालदाराचं टोकाचं पाऊल, राहत्या घरातच सगळं संपवलं, सोलापूर पोलिसांत खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल