TRENDING:

विषाच्या बाटलीचं झाकण आणि चप्पलनं समोर आणलं बायकोचं सत्य; बंगळूरु मर्डर केसची कहाणी हादरवून सोडेल

Last Updated:

पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याच्या अनेक घटना देशभरात समोर आल्या आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बंगाल, पंजाब आणि आता कर्नाटकातल्या बेंगळुरूमधून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : नाती ही विश्वासावर टिकलेली असतात. पूर्वी लग्न म्हणजे सात जन्मांचं बंधन मानलं जायचं. पण आजकाल मात्र नाती तुटायला वेळ लागत नाही. अगदी लव्हमॅरेज देखील लग्नाच्या दोन-तीन वर्षांनंतर तुटू लागली आहेत. हल्ली पती-पत्नीमधील वाद, संशय आणि फसवणूकीचं प्रमाण इतकं वाढलं आहे की अनेक वेळा हे नातं थेट जीव घेण्यापर्यंत पोहोचतं. यासंबंधीत अनेक प्रकरणं तुम्ही मागच्या काही दिवसांपासून ऐकलीच असतील.
बंगळूरु मर्डर केस
बंगळूरु मर्डर केस
advertisement

विशेषतः पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याच्या अनेक घटना देशभरात समोर आल्या आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बंगाल, पंजाब आणि आता कर्नाटकातल्या बेंगळुरूमधून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे.

असंच एक प्रकरण बेंगळुरुमधून समोर आलं आहे. ही घटना डोकं गरगरवून टाकणारी आहे. या प्रकरणाचा शोध घेत असताना पोलिसांना असा क्लू सापडला की त्यांनी मोठ्या हुशारीनं या मृत व्यक्तीच्या मारेकऱ्याला शोधून काढलं.

advertisement

बेंगळुरूमधील कण्वा धरणाजवळ एका माणसाचा मृतदेह सापडला. त्याच्या जवळच त्याची कार आणि विषाची एक रिकामी बाटली आढळली. दृश्य पाहून हे आत्महत्या प्रकरण वाटत होतं. तर मृत व्यक्तीची पत्नी घटनास्थळी रडत होती आणि त्याला दोष देत होती की, "तू असं का केलंस? मला एकटं का सोडलंस?"

पोलिस घटनास्थळी पोहोचले, आणि आधी आत्महत्या म्हणून प्रकरण पाहिलं जात होतं. पण दोन अधिकाऱ्यांनी काही शंका उपस्थित केल्या. त्यांना विषाची बाटली सापडली, पण त्या बाटलीचं झाकण त्यांना सापडलं नाही.तसेच मृत व्यक्तीच्या पायात एकच चप्पल का होती? अशा काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी नोटीस केल्या आणि मग त्याच्या मृत्यूचं गुढ उघडलं.

advertisement

मृत व्यक्तीचा ओळख 45 वर्षीय लोकेश कुमार अशी झाली. तो कृष्णपुरडोड्डी गावाचा रहिवासी आणि माकली ग्राम पंचायतचा माजी अध्यक्ष होता. त्याचे दोन चिकन दुकान होते. त्याची पत्नी चंद्रकला सध्या ग्राम पंचायत सदस्य होती.

घटनास्थळी चंद्रकला आली आणि रडू लागली. दुसऱ्या दिवशी तिने चन्नपटणामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि इतकी रडली की मीडियाच्या काही सदस्यांच्याही डोळ्यात पाणी आलं.

advertisement

पोलिसांनी मृत्यूचं कारण शोधण्यासाठी पोस्टमार्टम केला. अहवालानुसार मृत्यू विषामुळे झाला होता. पण डॉक्टरांनी सांगितलं की विष मोठ्या प्रमाणात छातीमध्ये आढळलं, जे जबरदस्तीने विष पाजल्यामुळे घडू शकतं. म्हणून पोलिसांनी दुसऱ्या खासगी हॉस्पिटलमध्ये पुन्हा पोस्टमार्टम केला. त्यातही तेच निष्कर्ष आले.

यानंतर पोलिसांनी कण्वा धरणाजवळील रस्त्यावरील हॉटेल आणि पेट्रोल पंपावरून सीसीटीव्ही फुटेज गोळा केलं. त्यात एक काळी कार दिसली जी घटनास्थळी आली होती. पोलिसांना स्थानिकांकडून माहिती मिळाली की 23 जूनच्या रात्री ही कार त्या ठिकाणी पाहिली गेली होती.

advertisement

पोलिसांनी चंद्रकला यांचा कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासला आणि असं आढळलं की ती बंगळुरूच्या जनरल पोस्ट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या योगेश नावाच्या व्यक्तीशी सतत संपर्कात होती. ठिकाण माहितीवरून कळलं की योगेशही 23 जूनच्या रात्री धरणाजवळ होता. या सर्व पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी चंद्रकला आणि योगेशला अटक केली आणि चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

काय घडलं त्या रात्री?

लोकेशला आपल्या पत्नीचं योगेशसोबत असलेला संबंध समजल्यामुळे चंद्रकला आणि योगेशने त्याचा खून करण्याचं ठरवलं. 23 जूनला, लोकेश जेव्हा आपल्या चिकन दुकानातून निघाला, तेव्हा चंद्रकलाने त्याची माहिती योगेशला दिली. काही दिवसांपूर्वीच विकत घेतलेली काळी कार वापरून योगेश आणि त्याचे दोन साथीदार लोकेशच्या मागे लागले. कण्वा धरणाजवळ त्यांनी लोकेशच्या गाडीला टक्कर दिली. बाहेर येताच त्याच्यावर हल्ला केला आणि जबरदस्तीने कारमध्ये बसवलं. त्याला विष पाजलं आणि मृत झाल्यावर त्याचा मृतदेह गाडीजवळ टाकून दिला. नंतर त्यांनी विषाची रिकामी बाटली बाजूला ठेवून तो आत्महत्या वाटावा यासाठी सीन तयार केला.

पोलिसांचं म्हणणं आहे. कितीही हुशारीने गुन्हा केला तरी एक ना एक पुरावा गुन्हेगाराकडून मागे राहतोच. कोणताही गुन्हा परफेक्ट नसतो.

मराठी बातम्या/क्राइम/
विषाच्या बाटलीचं झाकण आणि चप्पलनं समोर आणलं बायकोचं सत्य; बंगळूरु मर्डर केसची कहाणी हादरवून सोडेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल