TRENDING:

शहापूर पोलिसांचा 'अजब' कारनामा, मृत व्यक्तीच्या नावे काढली हद्दपारीची नोटीस, वाचा सविस्तर

Last Updated:

Kolhapur News : गणेशोत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सतर्क असतात. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर पोलिसांनी...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Kolhapur News : गणेशोत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सतर्क असतात. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर पोलिसांनी राबवलेल्या हद्दपार मोहिमेत एक धक्कादायक आणि तितकीच गंभीर चूक उघड झाली आहे. पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या नावावरच हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला असल्याचे समोर आले आहे.
Kolhapur News
Kolhapur News
advertisement

घडले काय?

शहापूर पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 64 गुन्हेगारांना हद्दपारीच्या नोटिसा बजावल्या. पण या कारवाईत मोठा निष्काळजीपणा दिसून आला. कारंडे मळा येथील अस्लम नुरमहंमद सोलापुरे यांचा सहा महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता. तरीही पोलिसांनी त्यांच्या नावावर हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून तो तहसील कार्यालयात पाठवला.

गैरप्रकार उघड झाला

जेव्हा पोलीस ही नोटीस बजावण्यासाठी सोलापुरे यांच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांना त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले. या घटनेमुळे पोलिसांच्या कामकाजावर आणि तपासणीतील निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे एका बाजूला पोलिसांनी हद्दपार गुन्हेगारांची नावे गुप्त ठेवून केवळ आकडेवारी जाहीर केली, तर दुसऱ्या बाजूला मृत व्यक्तीचे नाव हद्दपारीच्या यादीत समाविष्ट केल्याचा मोठा गैरप्रकार उघड झाला.

advertisement

हे ही वाचा : ऑनलाइन फूड मागवणं पडेल महागात! डिलिव्हरी करणाऱ्यांचंही इन्कम होऊ शकतं कमी

हे ही वाचा : 80 लाख EPS पेन्शनर्सच्या पैशांवर सरकारचा डल्ला, संतप्त जेष्ठ नागरिकांचा आरोप, 'हा' प्रश्न कधी सुटणार? 

मराठी बातम्या/क्राइम/
शहापूर पोलिसांचा 'अजब' कारनामा, मृत व्यक्तीच्या नावे काढली हद्दपारीची नोटीस, वाचा सविस्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल