बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला कडक सुरक्षा व्यवस्थेत पूर्ण स्वॅगसह पोहोचला. सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत ग्रँड एन्ट्रीचे फोटो समोर आल्यानंतर आता पार्टीतील इनसाइड फोटो आणि व्हिडीओंनी धुमाकूळ घातला आहे. यामध्ये मजा-मस्ती, धमाल आणि खूप सारे केक पहायला मिळत आहे.
advertisement
म्युझिक कंपोझर साजिद खान सलमान खानच्या 59 व्या बर्थ डे पार्टीला उपस्थित होते. त्यांनी या पार्टीतील व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमानसाठी खूप खास केक आलेले दिसत आहे. यातील एक तर चार मोठ्या लेअरचा आहे. बाकी रंगबेरंगी छान केक आहेत. सलमान केक कापत असताना त्याच्या बाजूला आयुष शर्मा आणि भाजी आयत आहे.
दरम्यान, कंपोझर साजिद खान यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊसही पहायला मिळतोय.
