अभिनेत्री मधुराणीने काही महिन्यांआधीच मुंबईतील विले पार्ले येथे स्वत:चं घर घेतलं होतं. हे तिचं मुंबईतील पहिलं घर होतं. या घराची झलकही तिने शेअर केली होती. मुंबईत नवं घर घेतल्यानंतर मधुराणीनं तिच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन केलं आहे.
( खरंच पूर्णाआजीच्या भूमिकेत दिसणार अभिनेत्री स्वाती चिटणीस? या कारणामुळे रंगलीये चर्चा)
advertisement
मधुराणीने खरेदी केली नवी कार
मधुराणीनं नुकतीच नवी कार खरेदी केली आहे. नव्या कारचा व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. लेकीसह मधुराणी तिची नवी कार खरेदी करण्यासाठी गेली होती. नवी कार खरेदी केल्यानंतरचा मधुराणीचा आनंद व्हिडीओमध्ये पाहायला मिळतोय.
"आनंद म्हणजे... नवीन गाडी.. नवीन ह्युंदाई क्रेटा..." असं म्हणत मधुराणीने तिच्या नव्या कारचा व्हिडीओ शेअर केला आहे. नवी कार खरेदी केल्यानंतर चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त करत तिचं अभिनंदन केलं आहे.
मधुराणीच्या कारची किंमत
मधुराणीने व्हाइट कलरची क्रेटा ही ह्युंदायी कंपनीची कार खरेदी केली. या कारची किंमत भारतीय बाजारपेठेत 13.26 लाख ते 25.37 लाख इतकी आहे. आई कुठे काय करते मालिका संपल्यानंतर मधुराणीने आधी नवीन घर खरेदी केलं आणि त्यानंतर आता नवीन कार घरी आणली आहे.
मधुराणी वर्कफ्रंट
मधुराणीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, आई कुठे काय करते मालिका संपल्यानंतर ती कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. 'ज्याचा त्याचा विठ्ठल' या शोचे प्रयोग ती करत असते. संपूर्ण महाराष्ट्रात तिच्या या शोचे प्रयोग हाऊसफुल सुरू आहेत. मधुराणी तिचे साडीतील सुंदर फोटोशूट देखील चाहत्यांबरोबर शेअर करत असते.