अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या एका व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. व्हिडिओमध्ये अभिषेक पत्नी ऐश्वर्याला प्रोटेक्ट करताना दिसत आहे. त्याने ऐश्वर्याच्या पाठीवर हात ठेवला आणि तिला आधी आत जायला सांगत आहे.
advertisement
अभिषेक आणि ऐश्वर्याने मुलगी आराध्याच्या शाळेच्या कार्यक्रमात एकत्र हजेरी लावली होती. इतकंच नाही तर यावेळी अभिषेक पत्नी ऐश्वर्या रायची सुरक्षा करताना आणि तिला कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास मदत करताना दिसला. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यक्रमात तिघेही एकत्र आले होते. ऐश्वर्या राय काळ्या ड्रेसमध्ये वेगळ्या कारमधून शाळेत पोहोचली. अमिताभ आणि अभिषेक बच्चन दुसऱ्या कारमधून एकत्र आले.
ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजरने लिहिले, 'मी आनंदी आहे. देव दोन्ही जोडप्यांना सुरक्षित ठेवो. आणखी एका यूजरने लिहिले की, 'बघा अभिषेक ऐश्वर्यावर किती प्रेम करतो.' आणखी एका युझरने लिहिलंय, हा सर्व दिखावा आहे का कारण त्याला माहित आहे की सर्वांच्या नजरा त्याच्यावर आहेत?
अभिषेक ऐश्वर्या यांच्याबरोबर अभिनेते अमिताभ बच्चन देखील नातीच्या शाळेत कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. आराध्या बच्चन आणि शाहरूखचा मुलगा अब्रराम यांनी ख्रिसमसवर आधारित एक कार्यक्रम सादर केला. आराध्या आणि अब्रराम यांनी मागील वर्षी देखील एकत्र एक कार्यक्रम केला होता. बिग बींची नात आणि शाहरूखच्या लेकाचा शाळेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.