जया बच्चनला ऐश्वर्याच्या हाती द्यायच्या होत्या घराच्या जबाबदाऱ्या, पण लेकीने अडवलं, म्हणाली, 'असं केलंस तर...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
जया बच्चन यांना त्यांची सून ऐश्वर्याकडे सर्व जबाबदाऱ्या सोपवायच्या होत्या, पण त्यांच्या मुलीने त्यामध्ये अनेक अडथळे निर्माण केले.
बच्चन कुटुंब हे फिल्म इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक आहे. अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. स्टारडमपासून खाली पडून आणि स्वतःला पुन्हा सिद्ध करून अमिताभ यांनी त्यांना मेगास्टार का म्हणतात, हे दाखवून दिले. एक काळ असा होता की अमिताभ आर्थिक समस्येने ग्रासले होते. पण परिस्थिती पुढे त्यांनी हार मानली नाही आणि प्रबळ इच्छाशक्तीने आज १६०० कोटी रुपयांची संपत्ती निर्माण केली.
advertisement
advertisement
ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबात काही ठीक चालत नसल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. पण अलीकडेच, अभिषेकसोबतच्या ऐश्वर्याच्या फोटोंमुळे त्या केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे. जया आणि ऐश यांच्या नात्याबाबत तुम्ही अनेक बातम्या वाचल्या असतील. पण तुम्हाला माहिती आहे का की, जया बच्चन यांना त्यांची सून ऐशकडे सर्व जबाबदाऱ्या सोपवायच्या होत्या, पण त्यांच्या मुलीने त्यामध्ये अनेक अडथळे निर्माण केले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जया बच्चन श्वेतासोबत 'कॉफी विथ करण'ला गेली होती, तेव्हा ही गोष्ट घडली. करण जोहरने जयाला सासू बनण्याच्या तिच्या भावनांबद्दल विचारले होते. त्याने विचारले 'आता ऐश्वर्या येईल आणि ती काही जबाबदाऱ्यांचा भार तुमच्या खांद्यावरून तिच्या खांद्यावर घेईल'. जया यांनी यावर होकार दिला आणि अशी आशा असल्याचे व्यक्त केले. त्या म्हणाल्या तिने केवळ काही जबाबदारी नाही तर सर्व जबाबदारी घ्यावी असे मला वाटते.
advertisement