पवन कल्याण यांचा मुलगा मार्क शंकर पवनोविच सध्या शारीरिक दुखापतींमुळे रुग्णालयात दाखल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंगापूरमधील त्यांच्या शाळेत अचानक आग लागली, आणि या दुर्घटनेत मार्कच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्याचसोबत, धुरामुळे श्वास घेण्यास अडचण होऊ लागल्याने त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.
advertisement
ANI ने त्यांच्या X (पूर्वीचं ट्विटर) हँडलवरून ही माहिती शेअर केली. त्यांनी लिहिलं की, “सिंगापूरमधील एका शाळेत आग लागली असून, आंध्र प्रदेशचे डिप्टी सीएम पवन कल्याण यांचा मुलगा या दुर्घटनेत जखमी झाला आहे.”
या घटनेची माहिती मिळताच, पवन कल्याण यांना सिंगापूरला लगेच रवाना होण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, त्यांनी सध्या मन्यम जिल्ह्यात सुरू असलेल्या दौऱ्याला प्राधान्य दिलं आहे. “मी या भागातील आदिवासी जनतेला काही आश्वासनं दिली आहेत. त्या वचनांशी मी प्रामाणिक आहे. त्यामुळे दौरा पूर्ण केल्यावरच मी सिंगापूरला जाईन”, असं पवन कल्याण म्हणाले.