Govinda-Sunita Ahuja: 'लोक कुत्रे आहेत, भुंकणारच..' गोविंदाची पत्नी भडकली, घटस्फोटाच्या चर्चांवर काय म्हणाल्या सुनिता अहुजा?

Last Updated:

Govinda-Sunita ahuja:गोविंदा आणि सुनिता अहुजाने त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्याविषयी वेगवेगळ्या बातम्या समोर येत होत्या.

गोविंदाची पत्नी भडकली, घटस्फोटाच्या चर्चांवर काय म्हणाल्या सुनिता अहुजा?
गोविंदाची पत्नी भडकली, घटस्फोटाच्या चर्चांवर काय म्हणाल्या सुनिता अहुजा?
मुंबई : गोविंदा आणि सुनिता अहुजाने त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्याविषयी वेगवेगळ्या बातम्या समोर येत होत्या. मात्र दोघांनीही या बातम्या फक्त अफवा असून खोट्या असल्याचे सांगितले. गोविंदा आणि पत्नी सतत चर्चेत असून अशातच सुनिता अहुजाचे नवीन स्टेटमेंट सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे.
गोविंदा आणि सुनिता वेगळे होणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता सुनिता अहुजा यांनी स्वतः पुढे येऊन या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. एका मुलाखतीत बोलताना सुनिता म्हणाल्या, “आमचे नातं चांगले आहे. गोविंदा आणि मी एकत्रच आहोत. आमच्यात सगळे ठीक आहे.”
advertisement
ट्रोलिंगवर काय म्हणाल्या सुनिता अहुजा
सुनिता यांनी सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवरही परखडपणे उत्तर दिले. “लोक काय बोलतात, काय ट्रोल करतात याचा काही फरक पडत नाही. जोपर्यंत माझ्या किंवा गोविंदाच्या तोंडून काही ऐकत नाही, तोपर्यंत अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका,” असे त्या ठामपणे म्हणाल्या.
त्यानंतर त्यांनी आपल्या मुलांबद्दलही खुलेपणाने सांगितले. मुलगा यशवर्धन लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तो याआधी ‘धूम’, ‘बागी’ आणि ‘किक 2’ या मोठ्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. सुनिता म्हणाल्या, “मी यशला नेहमी सांगते की तू गोविंदाच्या नावावर नको जगू, स्वतःची ओळख तयार कर.” तिची मुलगी टीना सुद्धा स्वतःचा मार्ग शोधत आहे. सुनिता म्हणाल्या, “टीना सध्या इतर कामांमध्ये बिझी आहे. तीही इंडस्ट्रीत आपले वेगळे स्थान निर्माण करेल.”
advertisement
दरम्यान, गोविंदाचा मोठा चाहता वर्ग असून त्याच्या कामाविषयी आणि पर्सनल आयुष्याविषयी देखील जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यामुळे सोशल मीडियावर गोविंदा आणि त्याच्या फॅमिलीविषयी काही ना काही गोष्टी व्हायरल होत असतात.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Govinda-Sunita Ahuja: 'लोक कुत्रे आहेत, भुंकणारच..' गोविंदाची पत्नी भडकली, घटस्फोटाच्या चर्चांवर काय म्हणाल्या सुनिता अहुजा?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement