सर्वात आधी ऐश्वर्याने वैयक्तिक हक्कांच्या संरक्षणासाठी याचिका दाखल केली. तिचा दावा होता की, तिचे फोटो आणि व्हिडिओ अनेक वेबसाइट्स परवानगीशिवाय वापरत आहेत. काही ठिकाणी हे फोटो चुकीच्या संदर्भात शेअर केले जात आहेत. अभिनेत्रीने न्यायालयाकडे आपल्या प्रतिमेचं रक्षण करण्याची मागणी केली.
'मी त्यांची विधवा, तू 15 वर्ष कुठे होती?' संजय कपूरच्या पत्नीचे करिश्मावर गंभीर आरोप
advertisement
याच पाठोपाठ, अभिषेक बच्चननेही न्यायालयात याचिका दाखल केली. त्याच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रवीण आनंद यांनी सांगितलं की, अनेक वेबसाइट्स आणि सोशल मीडिया अकाउंट्स अभिषेकचे बनावट व्हिडिओ, फोटो तयार करत आहेत. काही कंटेंटमध्ये तर त्याच्याशी संबंधित अश्लील कंटेंट तयार करण्यात आलं आहे. अशा व्हिडिओंमुळे त्याची प्रतिमा धोक्यात येऊ शकते आणि वैयक्तिक गोपनीयतेचा भंग होतो.
अभिषेकच्या वकिलाने ठामपणे सांगितलं की, “हे आदेश काळाची गरज आहेत. एआय आणि इतर डिजिटल साधनांचा वापर करून सेलिब्रिटींचा गैरवापर रोखणं आवश्यक आहे.”
या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या समोर सुरू आहे. बुधवारी सकाळी यावर चर्चा झाली आणि दुपारी पुन्हा सुनावणी होणार आहे. न्यायालयाने अभिषेकच्या वकिलाला यासंदर्भात अनेक प्रश्न विचारले असून, बनावट कंटेंट तयार करणाऱ्या वेबसाइट्सची यादी सादर करण्यास सांगितलं आहे.
यापूर्वीही बॉलिवूडमधील काही कलाकारांनी अशाच प्रकारे आवाज उठवला होता. अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांनीही डिजिटल जगतात त्यांच्या प्रतिमेचा गैरवापर थांबवण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. आता बच्चन दांपत्याच्या या कारवाईनंतर पुन्हा एकदा “सेलिब्रिटींचे डिजिटल हक्क” या मुद्द्यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.