TRENDING:

Akshay Kumar Car : अक्षय कुमारच्या कारवर कारवाई, रेंज रोवर केली जप्त, कारण काय?

Last Updated:

Akshay Kumar Car : अभिनेता अक्षय कुमारच्या कारवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याची कार जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी कारवाई करण्यासारखं अक्षय कुमारने असं केलं तरी काय?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार सध्या प्रॉपर्टी सेलिंगमुळेही चर्चेत आहे. त्यानं मागच्या काही महिन्यात मुंबईत जवळपास 3-4 प्रॉपर्टी विकल्या. यातून त्यानं खूप मोठा नफा मिळवला आहे. अशातच अक्षय कुमारला ट्रॅफिक पोलिसांनी झटका दिला आहे. अक्षय कुमारची रेंज रोवर कार जप्त करण्यात आली आहे. ट्रॅफिक पोलिसांनी कारवर कारवाई केली असून मोठा दंड देखील आकारला आहे. हे नेमकं कुठे झालं आणि का झालं?
News18
News18
advertisement

अक्षय कुमार मंगळवारी त्याची रेंज रोवर कार घेऊन जम्मू काश्मीरमध्ये एका कार्यक्रमासाठी पोहोचला होता. त्याच्या याच कारवर पोलिसांनी कारवाई केली आहे. वाहन चेकिंगच्या दरम्यान पोलिसांनी रेंज रोवर कार थांबवली आणि मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी अक्षय कुमारची रेंज रोवर जप्त करण्यात आली.

( Sara Ali Khan: अभिनेत्यांपासून ते क्रिकेटर्सपर्यंत; सारा अली खानच्या अफेअरची लिस्ट फारच मोठी, या सेलिब्रिटींशी जोडलं नाव! )

advertisement

पोलिसांच्या मते, अक्षय कुमारच्या रेंज रोवर कारला काळ्या काचा होत्या. जे मोटार वाहन कायद्याच्या नियमांविरुद्ध आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अक्षयच्या कारवर तात्काळ कारवाई करण्यात आली आणि कार जप्त केली. कायदा सर्वांना समान आहे मग ते सामान्य नागरिक असोत किंवा सेलिब्रेटी. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू राहिल असं वाहतूक विभागाकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकरणी अभिनेता अक्षय कुमारची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

advertisement

दरम्यान रेंज रोवर कारवर कारवाई करण्याच्याआधीच अक्षय कुमार दुसऱ्या कारमध्ये बसून निघून गेला होता. दरम्यान अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमार संध्याकाळी 5 वाजता जम्मूमध्ये CH01 AL 7766 नंबर असलेल्या रेंज रोवर कारमधून तिथे आला होता.  ही कार आयोजकांनी भाड्याने घेतली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारचा कार्यक्रम डोगरा येथे होता. तिथून तो याच कारने एअरपोर्टपर्यंत गेला. कारचा ड्रायव्हरल एअरपोर्टवरून परत येत असताना पोलिसांनी कार थांबवली आणि कारवाई केली. निर्धारित मानकांपेक्षा कारच्या काचेवर जास्त काळी फिल्म लावल्याचं पोलिसांना आढळलं आणि त्यांनी कारवाई केली.

advertisement

ड्युटीवर असलेल्या ड्रायव्हरकडे पोलिसांनी काळी फिल्म लावण्याचं लायसन्स आहेत असं विचारलं पण त्याच्याकडे कोणतंही डॉक्युमेंट नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी कार जप्त केली. या कारचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Akshay Kumar Car : अक्षय कुमारच्या कारवर कारवाई, रेंज रोवर केली जप्त, कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल