अमृता आणि विनायकवर चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लग्नसोहळ्यातील एक व्हिडीओ मात्र नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये विनायक भरमंडपात अमृताचा हात हातात घेत तिला वचन देतो की,"आपल्या आयुष्यात जी काही सुखं येतील त्यावर पहिला हक्क तुझा असेल. मी वाट बघेल". विनायक असं म्हणताच अमृताला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळत आहेत. विनायकच्या या वेगळेपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
advertisement
Marathi Actress : एकीकडे ग्लमरस दुनिया, दुसरीकडे भर उन्हात शेतात राबतेय मराठी TVची फेमस अभिनेत्री, PHOTO
अमृता-विनायक यांच्या लग्नात स्वानंदी बेर्डे, निखिल बने, निमिष कुलकर्णी, आकांशा गाडे, निरंजन जोशी हे मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकार उपस्थित होते. त्यांच्या लग्नातील साधेपणातील शाही अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लग्नसोहळ्यात अमृताने लाल रंगाची काठापदराची साडी, हातात हिरवा चुडा, गळ्यात सुंदर हार आणि नाकात नथ असा लूक केला होता. तर विनायकने ऑफ व्हाइट रंगाचा सदरा परिधान केला होता. त्यांचा पारंपारिक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यांच्या लग्नसोहळ्यात आकांशा गाडे आणि आशिष गाडे यांनी एक सुंदर रोमँटिक गाणंदेखील गायलं.
विनायक आणि अमृता गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजनसृष्टीत सक्रीय आहेत. नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये ते आपल्या अभिनयाची छाप पाडत आहेत. चाहत्यांना आता विनायक-अमृता दोघांना एकत्र एखाद्या कलाकृतीत पाहण्याची इच्छा आहे.