अंकिता लोखंडेने पवित्र रिश्ता मालिकेत प्रियासोबत काम केलं होतं. तिची ती खूप जवळची मैत्रीण होती. त्यामुळे अंकिताने प्रियाच्या आठवणीत तिच्या जाण्याचं दुःख व्यक्त केलं आहे.
'रात्री तू आम्हाला सोडवायला खाली आलीस आणि...' अभिनेत्रीने सांगितली प्रिया मराठेसोबतची शेवटची आठवण
अंकिता लोखंडे पोस्ट
अंकिताने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “प्रिया ही माझी पवित्र रिश्ता मधली पहिली मैत्रीण होती. मी, प्रार्थना आणि प्रिया… आमची छोटीशी टोळी. आम्ही तिघी एकत्र असताना नेहमीच खूप आनंदी आणि निरोगी वाटायचं.” अंकिता पुढे म्हणते की, “प्रिया, प्रॅट्स आणि मी एकमेकांना मराठीत प्रेमाने वेडे म्हणायचो आणि ते बंधन खरोखरच खास होतं.”
advertisement
या पोस्टमध्ये अंकिताने प्रियासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ती म्हणते, “माझ्या चांगल्या दिवसांत ती सोबत होती, आणि माझ्या दुःखाच्या दिवसांतही तिने साथ दिली. जेव्हा मला तिची गरज होती तेव्हा ती कधीही चुकली नाही. गणपती बाप्पाच्या वेळी गौरी महाआरतीला ती नेहमी हजर असायची. पण या वर्षी, मी तिथे तुझ्या आत्म्यासाठी प्रार्थना करेन, तुझी आठवण येईल वेडे.
अंकिता पुढे म्हणाली की, “प्रिया सर्वात बलवान होती. तिने प्रत्येक लढाई इतक्या धैर्याने लढली. आज ती आपल्यात नाही, आणि हे लिहितानाही माझं हृदय तुटतं. प्रियाला गमावणं ही अशी जाणीव करून देतं की आपल्याला कधीच माहित नसतं कोण आपल्या हास्यामागे कोणत्या लढाया लढत आहे. त्यामुळे नेहमी दयाळू राहा.”
शेवटी अंकिताने अत्यंत हळव्या शब्दांत लिहिलं, “प्रिया, माझ्या प्रिय वेडे, तू नेहमी माझ्या हृदयात आणि आठवणीत राहशील. प्रत्येक हास्यासाठी, प्रत्येक अश्रूसाठी आणि प्रत्येक क्षणासाठी धन्यवाद. आपण पुन्हा भेटेपर्यंत… ओम शांती.”
दरम्यान, रविवारी 31 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजता तिने अखेरचा श्वास घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण मराठी आणि हिंदी सिनेविश्वात शोककळा पसरली. गेल्या काही वर्षांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती. आजारामुळे दोन वर्षांपासून तिने स्वतःला जगापासून जवळजवळ दूर ठेवले होते. अगदी जिवलग मैत्रिणींनाही भेटू दिलं नव्हतं. त्यामुळे तिचं अचानक जाणं सर्वांसाठी धक्क्याचं आहे.