TRENDING:

Shilpa Shetty-Raj Kundra: शिल्पा शेट्टी-राज कुंद्राला हायकोर्टाचा आणखी एक मोठा झटका, नेमकं काय घडलं?

Last Updated:

Shilpa Shetty-Raj Kundra: बॉलिवूडची फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी आणि तिचा बिझनेसमन पती राज कुंद्रा सतत चर्चेत असतात. गेल्या काही काळापासून दोघेही 60 कोटी फसवणूक प्रकणामुळे अडचणीत सापडले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बॉलिवूडची फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी आणि तिचा बिझनेसमन पती राज कुंद्रा सतत चर्चेत असतात. गेल्या काही काळापासून दोघेही 60 कोटी फसवणूक प्रकणामुळे अडचणीत सापडले आहेत. अशातच आता दोघांना कोर्टाचा आणखी एक दणका मिळाला आहे.
शिल्पा शेट्टी-राज कुंद्राला हायकोर्टाचा दणका
शिल्पा शेट्टी-राज कुंद्राला हायकोर्टाचा दणका
advertisement

शिल्पा-राज यांनी 2 ते 5 ऑक्टोबर दरम्यान कुटुंबासोबत फुकेटला सुट्टी घालवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की सध्या कोणतीही सूट दिली जाणार नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 ऑक्टोबरला होणार आहे.

आलिया भट्टसोबत महिलेचं धक्कादायक कृत्य, भरगर्दीत हात ओढून स्वतःकडे खेचलं अन्... VIDEO VIRAL

या जोडप्याचे वकील निरंजन मुंदरगी आणि केरला मेहता यांनी न्यायालयात असा दावा केला की 2021 मध्ये दाखल झालेल्या प्रकरणानंतरही शिल्पा-राज यांनी अनेकदा परदेश प्रवास केला आहे आणि प्रत्येक वेळी तपासात पूर्ण सहकार्य केले आहे. त्यामुळे त्यांना आता परदेशात जाण्यास अडवणे अन्यायकारक असल्याचे ते म्हणाले.

advertisement

मात्र, सरकारी वकील मनकुंवर देशमुख यांनी त्यांचा युक्तिवाद धुडकावून लावला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, "शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर गंभीर आर्थिक गुन्ह्यांचे दोन खटले सुरू आहेत. 60 कोटी रुपयांपेक्षा मोठी फसवणूक प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे. अशा परिस्थितीत त्यांना परदेशात जाऊ देणे धोकादायक ठरू शकते."

या खटल्यामुळे शिल्पा-राज यांच्या पुढील योजनांनाही धक्का बसला आहे. याचिकेत त्यांनी नमूद केले होते की ते ऑक्टोबरमध्ये लॉस एंजेलिस, कोलंबो, मालदीवला व्यावसायिक कारणांसाठी जाणार आहेत. तसेच डिसेंबरमध्ये दुबई आणि लंडनला कुटुंबाला भेटण्यासाठी प्रवास करणार होते. पण सध्या तरी त्यांचा हा स्वप्नातील परदेश दौरा कोर्टाच्या निर्णयामुळे अडकला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Shilpa Shetty-Raj Kundra: शिल्पा शेट्टी-राज कुंद्राला हायकोर्टाचा आणखी एक मोठा झटका, नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल