ट्रेलरच्या पहिल्याच फ्रेमपासून प्रेक्षक एका गूढ आणि विलक्षण जगात प्रवेश करतात. नैनितालच्या निसर्गरम्य दऱ्याखोऱ्यांमध्ये, शुभ्र धुक्याच्या सान्निध्यात आणि गूढ हवेलीच्या वातावरणात घडणारी ही कथा आहे. भूतकाळ आणि वर्तमानकाळाच्या अनेक गोष्ट एकत्र येतात आणि या कथेचा जन्म होतो.
( Netflix Trending Movies : नेटफ्लिक्सवर ट्रेंड होतायत हे 10 मूव्ही; चौथा पार्टनसरसोबतच पाहा )
advertisement
मुक्ता बर्वेच्या नजरेतील भीती आणि प्रश्न, प्रिया बापटचे गूढ वर्तन, सचित पाटीलचा उत्तरांच्या शोधात असलेला प्रवास आणि संदीप कुलकर्णी यांचा या सगळ्याचा एकमेकाशी संबंध आहे. या थरार अंगावर काटा आणणारा आहे. सिनेमातील प्रत्येक पात्र काहीतरी लपवतंय आणि ते उलगडताना संपूर्ण चित्र बदलल्याचं पाहायला मिळतंय.
अभिनेता सचित पाटील या सिनेमाचा दिग्दर्शक आहे. त्यानं म्हटलंय, "या ट्रेलरमधून प्रेक्षकांना ‘असंभव’ची अनोखी झलक पाहायला मिळते. पुनर्जन्म ही संकल्पना मराठी चित्रपटात क्वचितच साकारण्यात आली आहे. रहस्य, थरार, भावना आणि वास्तव यांचा मिलाफ असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल. प्रत्येक पात्राचं जग उलगडताना, प्रेक्षक त्यांच्या भावनांशी एकरूप होतील."
'असंभव'चा दिग्दर्शक सचित पाटील तर पुष्कर श्रोत्रीनं सह-दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी हे कलाकार पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. रहस्य, भावना आणि नात्यांच्या गुंफलेल्या कथेतून उलगडणारा हा थरारक सिनेमा आहे. हा सिनेमा 21 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.
