‘बिग बॉस १९’ च्या घरात सध्या मुलींमध्ये जास्त वाद होताना दिसत आहेत. नेहल आणि फरहाना दोघीही तान्या मित्तलच्या मागे लागल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला अश्नूर कौर देखील फॉर्ममध्ये आली आहे. आता हे वातावरण आणखी गरम करण्यासाठी दुसरा कोणी नाही, तर मृदुल तिवारीचा शत्रूच वाइल्ड कार्ड म्हणून येणार आहे. हा स्पर्धक दुसरा कोणी नसून, शहनाज गिलचा भाऊ शाहबाज आहे. शाहबाज याआधी ‘बिग बॉस १३’ मध्ये दिसला होता आणि त्याने सलमानच्या आणि प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
advertisement
मृदुलने हरवलेल्या शाहबाजची वाइल्ड कार्ड एंट्री!
या सीझनच्या सुरुवातीला बिग बॉसने प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता तपासण्यासाठी एक मतदान घेतलं होतं. या मतदानात मृदुल आणि शाहबाज हे दोघे स्पर्धक होते. त्यात मृदुलला जास्त मतं मिळाली होती आणि त्याला घरात प्रवेश मिळाला होता, तर शाहबाजला स्टेजवरूनच शोला रामराम म्हणावं लागलं होतं.
आता शाहबाज ‘बिग बॉस १३’ सारखा या सीझनमध्ये किती धुमाकूळ घालतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सध्या कुनिका सदानंद, आवेज दरबार, तान्या मित्तल, मृदुल तिवारी आणि अमाल मलिक हे नॉमिनेट आहेत. यापैकी कोण दुसऱ्या आठवड्यात बाहेर पडणार, हे पाहणं रंजक ठरेल.