TRENDING:

Govinda-Sunita Ahuja : 'आता डिव्होर्स होणार नाही!' गोविंदाने सुनीताला दिला लाखोंचा नेकलेस, नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

Last Updated:

Govinda-Sunita Ahuja : करवा चौथला गोविंदाने सुनीता आहूजाला महागडा सोन्याचा हार भेट दिला. सोशल मीडियावर फोटो व्हायरल असून नेटकऱ्यांनी फोटोवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आज देशभरात अनेक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचे व्रत अत्यंत श्रद्धेने करत आहेत. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनीही आपल्या पतीसाठी उपवास ठेवला आहे. याच खास दिवशी बॉलिवूडचे 'हिरो नंबर १' गोविंदा यांनी आपली पत्नी सुनीता आहूजा यांना दिलेले खास 'करवा चौथ गिफ्ट' सध्या जोरदार चर्चेत आहे. सुनीता यांनी स्वतः या भेटवस्तूचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
News18
News18
advertisement

सुनीता आहुजाचं जबरदस्त कॅप्शन

अभिनेता गोविंदा यांनी सुनीता यांना एक मोठा आणि जड सोन्याचा हार भेट दिला आहे. सुनीता आहूजा यांनी इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्या हा सुंदर हार दाखवताना दिसत आहेत. हा हार पाहूनच त्याची किंमत लाखोंच्या घरात असेल, असा अंदाज चाहते लावत आहेत. या फोटोंसोबत सुनीता यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, "सोना कितना सोना है! गोविंदा... माझे करवा चौथचे गिफ्ट आले आहे." त्यांच्या या पोस्टवर चाहते आणि फॉलोअर्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

advertisement

'दशावतार'नंतर येतोय महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल चित्रपट, 'कांतारा'ला देणार तोडीस तोड टक्कर! भन्नाट टीझर रिलीज

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

मागील काही महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या आणि मतभेदांच्या चर्चा जोरदार रंगल्या होत्या. अशात करवा चौथच्या निमित्ताने गोविंदा यांनी सुनीता यांना एवढी महागडी भेटवस्तू दिल्यानंतर, चाहत्यांच्या प्रतिक्रिया खूपच गमतीशीर आणि तिखट आल्या आहेत.

advertisement

एका युजरने थेट लिहिले, "आता कोणताही घटस्फोट होणार नाही." तर दुसऱ्या एका युजरने 'चीटिंगनंतरचं गिफ्ट' अशी टिप्पणी केली. एका व्यक्तीने तर, "इतके सोने मिळूनही रोज यांचा घटस्फोट होत असतो," असे उपरोधिकपणे म्हटले आहे. तर एका युजरने, "रोज तर घटस्फोट घेत असतात," अशी आठवण करून दिली.

advertisement

'माझा गोविंदा फक्त माझाच आहे!'

करवा चौथच्या या गिफ्टमुळे पुन्हा एकदा गोविंदा आणि सुनीता यांच्यातील मतभेदांच्या अफवांवर पडदा पडला आहे. यापूर्वी गणेश चतुर्थीच्या वेळीही दोघांनी एकत्र येऊन घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
घरासारखी चव आणि किंमतही कमी, दिवाळीचा फराळ ठाण्यात इथं सगळ्यात स्वस्त
सर्व पहा

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सुनीता यांनी या चर्चांवर बोलताना स्पष्ट केले होते, "आम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही, वरून देव आला किंवा कोणताही शैतान आला तरीही कोणी आम्हाला वेगळं करू शकत नाही. माझा गोविंदा फक्त माझाच आहे आणि कोणाचा नाही. आम्ही तोंड उघडेपर्यंत, कृपया तुम्ही लोक कोणतीही गोष्ट बोलू नका."

मराठी बातम्या/मनोरंजन/
Govinda-Sunita Ahuja : 'आता डिव्होर्स होणार नाही!' गोविंदाने सुनीताला दिला लाखोंचा नेकलेस, नेटकऱ्यांनी घेतली फिरकी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल