200 रुपयांत चालवायचा घर
बॉलिवूडचा 'हा' अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून शत्रुघ्न सिन्हा आहे. अभिनय पदार्पण करण्याआधी शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेक छोटी-मोठी कामे केली आहेत. मिळालेल्या किरकोळ कमाईतून ते कसाबसा महिना काढत असे. अभिनेत्याने छोट्या पडद्यावरील 'इंडियन आयडॉल' या सांगितिक कार्यक्रमात आपल्या प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे. शत्रुघ्न सिन्हा म्हणाला होता,"मी तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो की, करिअरच्या सुरुवातीला मी पाच रुपयांसाठी रेडिओ प्ले करण्याचं काम करायचो".
advertisement
'मराठा आहे मी...' Bigg Boss 19 मध्ये मराठमोळ्या प्रणित मोरेचा संताप! नेमकं प्रकरण काय?
शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले, "अनेक मोठ-मोठ्या मंडळींनी आपल्या करिअरच्या सुरुवातीला खूप कष्ट घेतले आहेत. धमेंद्र, अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अनेक दिग्गजांचा यात समावेश आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी अनेक रात्री फूटपाथवर घालवल्या आहेत. तर काहींनी रेल्वे स्टेशनवर काढल्या आहेत. माझी स्वत:ची देखील 150 ते 200 रुपये महिन्याभराची कमाई होती. या 150 ते 200 रुपयांत महिना काढणं खरचं कठीण होतं. अनेक रात्री काहीही न खाता फक्त पाणी पिऊन झोपी गेलो आहे. पण स्वत:वर खूप आत्मविश्वास होता. आयुष्यात काहीतरी करण्याचा निर्धार होता. त्यासाठी मेहनतीची तयारी होती. त्यामुळे योग्यवेळी योग्य दिशा मिळत गेली".
शत्रुघ्न सिन्हाची कोट्यवधींची कमाई
नायकासह खलनायक म्हणूनही शत्रुघ्न सिन्हा अनेकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 'जीने नहीं दूंगा', 'भवानी जंक्शन', 'आंधी-तूफान','आंधी-तूफान','होशियार','खुदगर्ज', 'रणभूमी' आणि 'मुल्जिम'सह अनेक सुपरहिट चित्रपटांचा ते भाग आहेत. आपल्या दमदार अभिनयाने अनेक चित्रपट त्यांनी चांगलेच गाजवले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, शत्रुघ्न सिन्हा यांची एकूण कमाई 210 कोटींच्या आसपास आहे.
'या' चित्रपटाने दिला शत्रुघ्न सिन्हांना ब्रेक
शत्रुघ्न सिन्हा यांनी 1969 रोजी प्रदर्शित झालेल्या 'साजन' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी पोलिस इंस्पेक्टरची छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर 'प्रेम पुजारी'सह अनेक चित्रपटांत सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत ते झळकले. 'रामपुर का लक्ष्मण','भाई हो तो ऐसा','हीरा' आणि 'ब्लॅकमेल' या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेतून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. पण 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कालीचरण' या चित्रपटाने अभिनेत्याला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला.