काही दिवसांपूर्वी वरुण धवन 'बॉर्डर 2' चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी एका चित्रपटगृहात जाण्यास निघाला होता. वरुण धवन आधी गाडीने प्रवास करत होता, पण ट्रॅफिक लागलं, त्यामुळे त्याने गाडी सोडून मेट्रोने प्रवास करायचं ठरवलं. सोशल मीडियावर त्याचा मेट्रोतील व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यात तो चाहत्यांशी गप्पा मारताना दिसतो. त्यानंतर प्रवासादरम्यान वरुण असं काही करून बसतो, जे त्याने करायला नको होतं आणि तेच त्याला महागात पडलं.
advertisement
वरुण धवनने मेट्रोत केलं काय?
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता वरुण मेट्रोतील हँडलला लटकतो आणि एक्सरसाइझ करतो. मेट्रोत तो हँडल पकडून पुलअप करताना दिसतो. इतकंच नव्हे तर इतर प्रवाशांनाही तो यासाठी प्रोत्साहीत करतो. त्याच्यासोबत आणखी प्रवासीही असंच करताना दिसतो. ज्यामुळे बराच वाद निर्माण झाला.
समांथाचा एक्स नवरा, ज्याच्या प्रेमात होती श्रुती हासन; सख्खी बहिण ठरली ब्रेकअपचं कारण?
मुंबई मेट्रोच्या संचालनासाठी जबाबदार असलेल्या MMMOCL ने या कृत्यावर नाराजी व्यक्त केली. संस्थेने वरुण धवनचा हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आणि अभिनेत्याला फटकारलं. असे स्टंट प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करू शकतात. मेट्रो ग्रॅब हँडल प्रवाशांच्या संतुलनासाठी आहेत, व्यायामासाठी किंवा लटकण्यासाठी नाहीत, हे त्यांनी स्पष्ट केलं.
MMMOCL ने त्यांच्या X हँडलवर लिहिलं, "तुमच्या अॅक्शन चित्रपटांप्रमाणे हा व्हिडिओ डिस्क्लेमरसह यायला हवा होता. वरुण धवन, कृपया महा मुंबई मेट्रोवर हे वापरून पाहू नका. आम्हाला समजते की मित्रांसोबत मेट्रोने प्रवास करणे छान आहे, पण हे हँडल लटकण्यासाठी नाहीत. मेट्रो रेल्वे (ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स) कायदा, 2002 अंतर्गत, उपद्रव किंवा मालमत्तेचे नुकसान करण्याशी संबंधित कलमांखाली अशा कृत्यांसाठी शिक्षा आहे. यामुळे दंड होऊ शकतो आणि गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार तुरुंगवास देखील होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, मेट्रोने प्रवास करा, पण लटकू नका. महा मुंबई मेट्रोवर जबाबदारीने प्रवास करा."
वरुण धवनला मेट्रो प्रवासाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याचं वृत्त मीडियाने दिलं आहे.वरुण धवनसाठी दंडाची रक्कम कमी असली तरी त्याच्याविरोधात एमएमआरडीएकडून दंडात्मक कारवाई झाल्याने ही बाब महत्त्वाची मानली जात आहे.
पहिल्या दिवशीच 60 कोटी पार! 'बॉर्डर 3' नंतर 'गदर 3' ही येणार, अमिषा पटेलनं दिली मोठी अपडेट
वरुण धवनचा मेट्रोतील हा वाद नवा नाही. याआधीही त्याने चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अभिनेत्री कियारा अडवानीसोबत प्रवास केला होता. तेव्हा दोघांनी मेट्रोत वडापाव खाल्ला होता. नियमानुसार मेट्रो गाडीत खाद्यपदार्थ खाण्यास मनाई आहे.
बॉर्डर 2 च्या भूमिकेमुळे ट्रोल
अलीकडेच 'बॉर्डर 2' च्या ट्रेलरमध्ये वरुण धवनला त्याच्या हावभावांसाठी, विशेषतः त्याच्या हास्यासाठी ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. यावर चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार आणि दिग्दर्शक अनुराग सिंग यांनी त्याचं समर्थन केलं. भूषण कुमार म्हणाले की वरुण त्याच्या प्रत्येक पात्रासाठी खूप समर्पित आहे आणि त्याने या चित्रपटातही खूप प्रामाणिकपणे काम केलं आहे. अनुराग सिंग यांनी आठवण करून दिली की स्टुडंट ऑफ द इयर नंतर या अभिनेत्याने बदलापूर आणि ऑक्टोबरसारख्या चित्रपटांमध्ये आपली रेंज दाखवली आहे.
