जेफरसन मचाडो… एक देखणा चेहरा, एक यशस्वी पत्रकार आणि नंतर एक लोकप्रिय टीव्ही अभिनेता. त्याच्या आयुष्यात सगळे काही सुरळीत सुरू होते. अशातच, त्याची ओळख 'ग्लोबो' या प्रसिद्ध टीव्ही चॅनेलसाठी काम करणाऱ्या सूझा रॉड्रिग्जशी झाली. रॉड्रिग्जला पैशांची गरज असताना जेफरसनने त्याला मोठी रक्कम उधार दिली. त्याबदल्यात, रॉड्रिग्जने त्याला ‘ग्लोबो’सोबत काम मिळवून देण्याचं वचन दिलं.
advertisement
डिसेंबर २०२२ मध्ये, रॉड्रिग्जने जेफरसनच्या घरापासून २० किलोमीटर दूर एक घर भाड्याने घेतलं, जे नंतर या भयानक कथेचा केंद्रबिंदू बनलं.
८ कुत्र्यांनी उघडकीस आणलं गूढ!
जेफरसनला कुत्र्यांची खूप आवड होती. त्याच्याकडे ८ सेटर जातीचे कुत्रे होते, ज्यांना तो स्वतःच्या मुलांप्रमाणे जपायचा. २७ जानेवारी २०२३ रोजी, त्याचे ८ कुत्रे अचानक रस्त्यावर फिरताना दिसले. शेजाऱ्यांनी एका स्वयंसेवी संस्थेला कळवलं. त्यांच्या गळ्यातील चिप तपासल्यावर ते जेफरसनचे असल्याचं समोर आलं. यामुळे त्याच्या कुटुंबाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
मागच्या सीटवरून येत होता 'आह आह' आवाज, ड्रायव्हर घाबरला, आशा भोसलेंनी सांगितला होता 'तो' किस्सा
जेफरसनने २३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी त्याच्या आईशी शेवटचा फोन केला होता आणि त्यानंतर त्याचा नंबर बंद होता. कुटुंबाने पोलिसांना कळवलं. तपास सुरू झाल्यावर जेफरसनच्या गाडीच्या चाव्या, पाकीट आणि इतर सामान रॉड्रिग्जकडे असल्याचं कळलं. पण रॉड्रिग्जने पोलिसांना सांगितलं की जेफरसननेच त्याला ते दिले होते.
‘त्या’ रात्री काय घडलं?
पोलिसांनी जेफरसनच्या मोबाईल रेकॉर्ड तपासले. त्यात कळलं की, २३ जानेवारी रोजी त्याने शेवटचा फोन रॉड्रिग्ज आणि झेंडर नावाच्या एका व्यक्तीला केला होता. झेंडर हा एक कॉल बॉय होता. लोकेशन तपासल्यावर पोलीस हैराण झाले! त्या रात्री रॉड्रिग्ज आणि झेंडर दोघेही जेफरसनच्या घरात होते. पोलिसांनी दोघांचाही शोध सुरू केला. पण, दोघेही फरार होते, त्यामुळे संशय आणखी वाढला.
पोलिसांनी रॉड्रिग्जच्या घराची चौकशी केली. शेजाऱ्यांनी सांगितले की, जेफरसन बेपत्ता झाल्यावर रॉड्रिग्जने त्याच्या घरात एक विचित्र बांधकाम सुरू केलं होतं. घराच्या मागील अंगणात त्याने सिमेंटच्या उंच भिंती बांधल्या होत्या आणि जमिनीवर काँक्रीटचा थर टाकला होता.
सिमेंटच्या खाली दडलेला एक मृतदेह…
जानेवारीपासून मेपर्यंत जेफरसनचा कोणताही पत्ता लागला नाही. अखेर, २३ मे २०२३ रोजी पोलिसांना रॉड्रिग्जच्या घराची झडती घेण्याचं वॉरंट मिळालं. पोलिसांनी अंगणात खोदकाम सुरू केलं. हळूहळू एक लाकडी पेटी दिसू लागली. ६ लोकांनी ती जड पेटी बाहेर काढली आणि उघडली. आतमध्ये एक भयानक दृश्य होतं.
फुटपाथवर झोपला, दारुच्या व्यसनाने झाला उद्ध्वस्त; प्रसिद्ध डायरेक्टरला बायकोनेच काढलं घराबाहेर
पेटीत जेफरसनचा नग्न आणि कुजलेला मृतदेह होता. त्याचे हात डोक्याच्या मागे दोरीने बांधलेले होते आणि गळ्यात टेलिफोनची तार गुंडाळलेली होती. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं. त्याच्या शरीरात अंमली पदार्थ देखील आढळले होते.
अखेर, सत्य आलं समोर!
पोलिसांनी झेंडरला अटक केली. चौकशीदरम्यान, झेंडरने हत्येचं संपूर्ण गूढ उघड केलं. तो म्हणाला की, रॉड्रिग्जने जेफरसनला ड्रग्ज दिले, त्याचे हात बांधले आणि नंतर टेलिफोनच्या वायरने गळा दाबून त्याला मारलं. नंतर त्याचा मृतदेह एका पेटीत बंद करून अंगणात पुरला. झेंडरच्या जबाबानंतर रॉड्रिग्जला इंटरपोलच्या वॉन्टेड यादीत समाविष्ट केलं गेलं आणि १५ जून २०२३ रोजी त्याला अटक झाली. एका मित्रानेच फसवणूक करून अशाप्रकारे एका देखण्या अभिनेत्याची क्रूर हत्या केल्याची कहाणी ऐकून सगळेच स्तब्ध झाले.