Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामागील एक मोठं कारण म्हणजे दोन अत्यंत बहुप्रतिक्षित चित्रपटांमधून तिचं बाहेर पडणं. पहिला चित्रपट होता प्रभाससोबत संदीप रेड्डी वांगाचा ‘स्पिरिट’, ज्यात दीपिकाच्या जागी तृप्ती डिमरीची निवड झाली. दुसरा होता प्रभास आणि अमिताभ बच्चन यांचा ‘कल्की 2898 AD’ चा आगामी सिक्वेल. तर्कवितर्क केले जात होते की दीपिकाने नुकतीच आई झाल्यामुळे 8 तासांच्या शिफ्टची अट घातली होती आणि यामुळेच तिला दोन्ही प्रोजेक्ट्समधून बाहेर केलं गेलं, असे तर्कवितर्क केले जात होते. याबाबत सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि हिंदी-मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनीही खूप चर्चा केली. अखेर दीपिकाने या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे.
advertisement
दीपिका पदुकोण वर्किंग अवर्सबाबत काय म्हणाली?
'सीएनबीसी-टीव्ही 18'ला दिलेल्या एका मुलाखतीत, टीकेचा सामना करत असलेल्या दीपिकाने वर्किंग अवर्सवरील वादाबाबत मत व्यक्त केलं. दीपिका पदुकोण म्हणाली,"एक स्त्री म्हणून जर हे दबाव टाकल्यासारखं वाटत असेल, तर तसंच असो, पण हे काही लपवण्यासारखं नाही की भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक पुरुष सुपरस्टार्स अनेक वर्षांपासून फक्त 8 तासच काम करत आहेत आणि यावर कधीही प्रकाश टाकला गेला नाही. मी आता कोणाचं नाव घेणार नाही. किंवा याला जास्त महत्त्व देणार नाही. पण हे खूप कॉमन आहे. सगळ्यांना माहिती आहे की अनेक पुरुष अभिनेते अनेक वर्षांपासून फक्त 8 तासच काम करत आहेत. त्यातले काही फक्त सोमवार ते शुक्रवार काम करतात, आणि वीकेंडला काम करत नाहीत.
क्रिकेटर व्हायचं स्वप्न, पण बनला बॉडीबिल्डर, एका सर्जरीनं आयुष्य संपलं; मिस्टर इंडिया वरिंदर घुम्मणची Inside Story
दीपिका पदुकोणने कोणत्या अडचणींचा सामना केला?
दीपिका पदुकोण म्हणाली,"मी कधी काही डिमांड केली तर त्याची मला किंमत मोजावी लागली आहे. माझ्यासाठी हे काही नवीन नाही. मला वाटतं पेमेंटसारख्या गोष्टींच्या बाबतीत सुद्धा मला जे काही मिळालं त्यावर मी फार प्रतिक्रिया दिली नाही. मला माहीत नाही याला काय म्हणावं. पण मी नेहमी माझ्या लढाया शांतपणे लढते. गोंधळ घालणं हा माझा मार्ग नाही आणि मी अशा पद्धतीनं मोठी झालेली नाही. मानधनाच्या बाबतीतही आजवर मला वेगवेगळ्या अनुभवांना तोंड द्यावं लागलं आहे. अफवा पसरवणं ही माझी स्टाईल नाही. माझ्यावर तसे संस्कार झालेले नाहीत. माझ्या लढाया मी शांतपणे आणि सन्मानाने हाताळते."
दीपिका पदुकोण दोन चित्रपटांमधून बाहेर का पडली?
दीपिका पदुकोण लवकरच शाहरुख खानसोबत 'किंग' या चित्रपटात आणि अल्लू अर्जुनसोबत AA22xA6 या अॅक्शन ड्रामामध्ये दिसणार आहे. 8 तासांपेक्षा जास्त वेळ चित्रीकरण करावं लागणार असल्याने ती नुकतचं ‘कल्की 2898 AD’ आणि ‘स्पिरिट’ च्या सिक्वेलमधू बाहेर पडली आहे आणि त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.