या सगळ्यात अभिनेते धर्मेंद्र यांच्या अनेक जुन्या आठवणी आणि किस्से समोर आले. त्यांच्या सिनेमातील अनेक जुने व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात अभिनेते धर्मेंद्र शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना मिठी मारताना दिसत आहेत. बाळासाहेबांचे अनेक कलाकारांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते. धर्मेंद्र यांच्याबरोबरही त्यांची खूप छान मैत्री होती. पण असं काय झालं होतं ज्यामुळे धर्मेंद्र यांनी बाळासाहेबांना घट्ट मिठी मारली होती. त्यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
advertisement
धर्मेंद्र आणि बाळासाहेबांचा हा व्हिडीओ 29 वर्षांआधी आलेल्या एका सिनेमावेळचा आहे. 1996 साली आलेल्या धर्मेंद्र यांच्या अग्निसाक्षी या सिनेमाच्या मुहूर्तासाठी अनेक सेलिब्रेटी आणि राजकीय मंडळींनी हजेरी लावली होती. सिनेमाच्या मुहूर्ताला बाळासाहेब ठाकरे यांनीही हजेरी लावली होती. धर्मेंद्र यांनी सिनेमाच्या मुहूर्ताचा क्लॅप दिला होता. बाळासाहेब ठाकरे, जॅकी श्रॉफ आणि नाना पाटेकर या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
https://youtube.com/shorts/l9objvXM4z8?si=Rni0LlJFcmxJes_-
'अग्निसाक्षी' या सिनेमाची निर्मिती बाळासाहेबांचा मुलगा बिंदा यांनी केली होती. 1994 साली मुंबईतील अंधेरीच्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये सिनेमाच्या मुहूर्ताचं आयोजन करण्यात आलं होतं. 'अग्निसाक्षी' या सिनेमाची निर्मिती बाळासाहेबांचा मुलगा बिंदा यांनी केली होती. मुंबईतील अंधेरीच्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये सिनेमाच्या मुहूर्ताचं आयोजन करण्यात आलं होतं. 'अग्निसाक्षी' या सिनेमात अभिनेते नाना पाटेकर, मनीषा कोईराला, जॅकी श्रॉफ, रवी बहल, दिव्या दत्ता हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. 1996 च्या सुपरहिट सिनेमांपैकी हा एक सिनेमा होता.
