धर्मेंद्र कोणत्याही कार्यक्रमात आले की त्या कार्यक्रमाला चार चांद लावतात. सलमान खान आणि इतरांनी देखील धर्मेंद्र यांच्याबरोबर चांगला वेळ घालवला. धर्मेंद्र यांनी ग्लास हातात ठेवून बॅलेंन्स करण्याचा प्रयत्न करत डान्स केला. त्यानंतर त्यांनी थेट ग्लास तोंडात ठेवून डान्स केला. धर्मेंद्र यांना पाहून सलमान आणि अरबाज यांनी ग्लास डोक्यावर ठेवले. दरम्यान अभिनेता कृष्णा यांनी धर्मेंद्र यांच्या हातात असलेला रिकामी ग्लास पाहून पंच मारला. पंजाबी लोकांच्या हातात रिकामी ग्लॉस कोण देत? कृष्णाच्या या पंचवर एकच हशा पिकला.
advertisement
हेही वाचा - Bigg Boss 17 च्या घरात सलमानचं रौद्ररूप! भाईजानचं बोलणं ऐकून बेशुद्ध पडली अभिनेत्री; अचानक घेतली एक्झिट
बिग बॉसच्या मंचावरची ही धम्माल पाहून प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. सलमान खानच्या विकेंड का वॉरमध्ये आयेशा खाननं चांगलाच राडा केला. तर सलमान खानानं मुनव्वरला चांगलाच छापलं. विकेंड का वॉरच्या मसाल्यानंतर बिग बॉसच्या प्रेक्षकांना धर्मेंद्र आणि इतर कलाकारांच्या एंट्रीनं नवीन वर्षाची मजेदार ट्रिट मिळाली.
धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओलचा एनिमल हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाला चांगली प्रेक्षक पसंती मिळाली. सिनेमातील बॉबीनं साकारलेला व्हिलन प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. वयाच्या 54व्या वर्षी बॉबीनं स्वत: वर केलेली मेहनत मोठ्या पडद्यावर कहर करून केली. व्हिलन असूनही त्यानं हिरोच्या तोडीस तोड काम केलं. सिनेमातील त्याचं जमाल कडू हे गाणं सध्या सोशल मीडियावर खूप गाजतंय. गाण्यात त्यानं डोक्यावर दारूचा ग्लास ठेवून केलेला डान्स तर व्हायरल झालाय.