धर्मेंद्र यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथे ते जीवन मरणाची लढाई लढत होते. हॉस्पिटलमधील लीक झालेल्या व्हायरल व्हिडीओमध्ये धर्मेंद्र यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं दिसत आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब यावेळी तिथे उपस्थित होतं. धर्मेंद्र यांना बेडवर निप्चित पडलेलं पाहून त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांना धक्का बसला. त्यांना अश्रू अनावर झाले. त्या मोठ मोठ्याने रडताना दिसत आहेत. त्यांचा मुलगा सनी देओल त्यांना सांभाळताना दिसत आहे.
advertisement
धर्मेंद्र यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर दिसत आहे. सनी देओल, बॉबी देओल आणि त्यांच्या दोन्ही मुलीही तिथे उपस्थित असल्याचं दिसतंय. सनी आणि बॉबी देखील रडताना दिसत आहेत. प्रकाश रडत रडत धर्मेंद्र यांना 'एक बार उठ जाओ मेरी तरफ देखो, हाय रब्बा जल्दी ठीक हो जाओ', असं बोलत ढसाढसा रडत होत्या.
दरम्यान धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या प्रकृतीत हळू हळू सुधारणा होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. अभिनेता सनी देओलच्या टीमनं देखील अधिकृतपणे पोस्ट शेअर करत त्यांची तब्येत ठीक असल्याचं सांगितलं.
अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयातून घरी गेल्यानंतर त्यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक आणि कलाकार मंडळी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. अभिनेते अमिताभ बच्चन धर्मेंद्र यांना पाहण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते.
