दक्षिणेतील अभिनेत्री डिंपल हयाती आणि तिचा पती डेव्हिड मोठ्या अडचणीत सापडले आहेत. हैदराबाद पोलिसांनी या जोडप्याविरुद्ध मोलकरणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. 22 वर्षांची प्रियंका बीबर, ओडिशातील रायगड जिल्ह्याची रहिवासी, काही दिवसांपूर्वी कामाच्या शोधात हैदराबादला आली होती. एजन्सीद्वारे तिला डिंपल हयाती आणि तिच्या पतीच्या घरी मोलकरणीचे काम मिळाले. मात्र, नोकरी सुरू झाल्यापासूनच तिचा छळ सुरू झाला, असे पीडितेचे म्हणणे आहे.
advertisement
'त्यांना आम्ही एकत्र नको आहोत..' सुनीता आहुजाने सांगितलं सगळं प्रकरण
मोलकरणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, तिच्याशी वाईट वागणूक करण्यात आली, योग्य अन्न नाकारले गेले आणि शिवीगाळ करण्यात आली. एवढंच नव्हे तर, “तुझं आयुष्य आमच्या बुटांच्या किंमतीएवढंही नाही,” असे अपमानास्पद वक्तव्यही करण्यात आल्याचा आरोप तिने केला.
29 सप्टेंबर रोजी झालेल्या वादात परिस्थिती अधिक बिघडली. तिचा फोन हिसकावून तोडण्यात आला, तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि कपडे फाडले गेल्याचा धक्कादायक आरोप पीडितेने केला आहे. इतकंच नाही तर तिचे नग्न चित्रीकरण करण्याचाही प्रयत्न झाला, असा गंभीर दावा तिने केला आहे. या घटनेनंतर एजन्सीच्या मदतीने ती पोलिसांकडे पोहोचली आणि तक्रार नोंदवली. फिल्मनगर पोलिसांनी या प्रकरणात IPC च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. अद्याप डिंपल हयाती किंवा तिच्या पतीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, डिंपल हयातीसाठी वाद नवे नाहीत. 2023 मध्ये तिच्या आणि पती डेव्हिडविरुद्ध एफआयआर दाखल झाला होता, जेव्हा त्यांच्या कारने एका आयपीएस अधिकाऱ्याच्या गाडीला धडक दिली होती. त्यावेळी डिंपलने आयपीएस अधिकाऱ्यावर अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. 2017 मध्ये तेलुगू चित्रपट “गल्फ” मधून तिने पदार्पण केले. त्यानंतर ती देवी 2, खिलाडी, युरेका, रामबनम आणि वीरमाई वागाई सूदूम अशा चित्रपटांमध्ये दिसली. हिंदी प्रेक्षकांसाठी ती आनंद एल. राय यांच्या “अतरंगी रे” मध्येही दिसली होती, जिथे तिने धनुषची माजी मंगेतर मंदाकिनीची भूमिका केली होती.