मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलिसांनी हरियाणामधील सोनीपत जिल्ह्यातील जज्जल येथील रहिवासी असलेल्या विशाल नावाच्या तरुणाला अटक केली आहे. त्याने फाझिलपुरियाच्या हालचालींवर पाळत ठेवून तो कुठे आहे याची माहिती गोळीबार करणाऱ्यांना दिली होती. मिडिया रिपोर्ट्सनुसार, हल्ल्यापूर्वी विशाल बरेच दिवस गुरुग्राममध्ये थांबला होता आणि गोळीबार झाला त्या दिवशीही तो शहरातच होता.
राहुल फाजिलपुरियावर का झाला हल्ला?
advertisement
दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी सुनील सरधानिया नावाच्या व्यक्तीने घेतली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून त्याने सांगितलं की, या हल्ल्यात त्याच्यासोबत दीपक नांदल आणि इंद्रजित यादव हे दोघेही सामील होते. तसेच, फाझिलपुरियाने नांदलचे ५ कोटी रुपये बुडवल्याचा दावाही त्याने केला आहे.
'गल्लीतला गुंड...', 'कालिया' म्हणत काढली लाज, लग्नाआधीच शत्रुघ्न सिन्हांच्या सासूने उतरवला माज
"दीपकने फाझिलपुरियाला सेलिब्रिटी बनवण्यासाठी ५ कोटी रुपये गुंतवले होते. प्रसिद्ध झाल्यावर राहुल फाझिलपुरियाने आपल्या राजकीय ताकदीचा वापर करत गेल्या दोन वर्षांपासून ना फोन उचलला, ना कोणाला उत्तर दिलं. याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आता ही शेवटची वॉर्निंग आहे, त्याने पैसे परत द्यावेत, नाहीतर त्याच्यासोबत फिरणाऱ्या १० ओळखीच्या आणि नातेवाईकांची माहिती आमच्याकडे आहे," असा धमकीचा सूर त्या सोशल मीडिया पोस्टमध्ये होता.
राहुल फाजिलपुरियाला कशी मिळाली प्रसिद्धी?
फाझिलपुरियाने अजूनतरी या आरोपांवर किंवा हल्ल्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार, २०१० मध्ये फाझिलपुरिया आणि नांदल यांची जेलमध्येच भेट झाली होती. फाझिलपुरियाचं खरं नाव राहुल यादव आहे. २०१६ मध्ये आलिया भट्ट, फवाद खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या 'कपूर अँड सन्स' चित्रपटातील 'कर गई चूल' या गाण्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. हा गोळीबार नेमका कशामुळे झाला, याची पोलीस अधिक चौकशी करत आहेत.