घटस्फोचा फाइल करत सुनीता आहुजा यांनी गोविंदावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. एवढंच नाही तर डिसेंबर 2024 मध्ये दाखल झालेल्या या प्रकरणात गोविंदा अनेक सुनावण्यांना अनुपस्थित राहिल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र सुनीता प्रत्येक वेळेला कोर्टात हजर राहिल्या आहेत.
गोविंदाचा संसार मोडणार? सुनीता आहुजाने फाइल केला डिवोर्स; अभिनेत्यावर केले गंभीर आरोप!
advertisement
घटस्फोटाच्या अफवांमध्येच मुलगा यशवर्धन आहुजाने एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्याने घरी झालेल्या पूजेचा फोटो टाकला आणि लिहिलं, “माझा धाकटा मुलगा (पाळीव कुत्रा) देखील आमच्यासोबत पूजेत सामील झाला.” या पोस्टच्या टायमिंगमुळे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. गोविंदाची मुलगी टीना आहुजाही शांत बसली नाही. तिने चंदीगडमधून एक जिम सेल्फी शेअर केला.
एका बाजूला सुनीता यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असल्याच्या बातम्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला मुलं नेहमीप्रमाणे आपले आयुष्य आणि काम दाखवत आहेत. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला आहे, खरंच गोविंदा-सुनीता नातं तुटलंय का? की फक्त अफवांचा खेळ सुरू आहे?
गोविंदा आणि सुनीता यांचं लग्न 1987 मध्ये झालं. दोघांनी एकत्रित सुखी संसार केल्याचं नेहमीच दिसलं. पण आता नात्यात दुरावा आला असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे गोविंदा-सुनीताचा 38 वर्षांचा संसार खरंच तुटणार का? अशी चिंता चाहत्यांना लागून आहे.