अलीकडेच सुनीताने तिच्या आयुष्याचा एक वेगळा पैलू चाहत्यांसमोर आणला. तिने स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे आणि पहिल्याच व्लॉगमध्ये ती चंदीगडमधील मा कालीच्या मंदिरात गेली. व्हिडिओची सुरुवात हलक्या-फुलक्या अंदाजात होते. सुनीता म्हणते, “लोकांनी खूप पैसे छापले, आता नोटा छापण्याची माझी वेळ आहे.” यानंतर ती बाईकवरून मंदिरात पोहोचते, मध्येच दारू खरेदी करताना दिसते. पण, पुढच्या क्षणाला वातावरण गंभीर होतं
advertisement
'त्या कुटुंबाने माझ्याभोवती गर्दी करुन...' जया बच्चन प्रकरणावर मराठी अभिनेत्रीची पोस्ट
सुनीता मंदिरात भटजींसमोर बोलताना भावूक होते आणि डोळ्यात पाणी येतं. सुनीता सांगते, "लहानपणी आई मला महालक्ष्मी मंदिरात घेऊन जायची. ते मंदिर मला खूप आवडायचं. गोविंदाला पहिल्यांदा भेटले तेव्हा मी देवाला प्रार्थना केली 'माझं लग्न ह्याच्याशी व्हावं.' आणि माझी इच्छा पूर्ण झाली. आज माझ्याकडे दोन सुंदर मुलं आहेत."
पण तिच्या डोळ्यातलं पाणी केवळ आठवणींसाठी नव्हतं. ती पुढे म्हणाली, "मी नेहमी पूजा-पाठ करते. पण आयुष्यात चढ-उतार येतातच. सध्या मी कठीण काळातून जातेय. मला माता राणीवर पूर्ण विश्वास आहे माझं घर उद्ध्वस्त होऊ देणार नाही. जो माझ्या कुटुंबाला नुकसान करेल, त्याला माता सोडणार नाही." सुनीताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते तिच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत आहेत.