TRENDING:

कंगनाचा इमर्जन्सी सिनेमा पाहून मुंबईकर काय म्हणाले…Video

Last Updated:

आणीबाणी या विषयावर आधारित असलेला इमर्जन्सी हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. पुन्हा एकदा कंगना या चित्रपटांमध्ये चौकटीच्या बाहेरची भूमिका साकारते आहे, असं म्हणायला हरकत नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निकिता तिवारी, प्रतिनिधी 
advertisement

मुंबई : आणीबाणी या विषयावर आधारित असलेला इमर्जन्सी हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला घेऊन अनेक वाद आणि चर्चा निर्माण झाल्या होत्या. मात्र अखेर मोठ्या काळाच्या प्रतीक्षेनंतर हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत अभिनेत्री कंगना राणावत झळकत आहे. पुन्हा एकदा कंगना या चित्रपटांमध्ये चौकटीच्या बाहेरची भूमिका साकारते आहे,  असं म्हणायला हरकत नाही. आज प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट मुंबईकरांना कसा वाटला? याबद्दलचं लोकल 18 च्या प्रतिनिधीने जाणून घेतलं.

advertisement

चित्रपट मुंबईकरांना कसा वाटला?

इतिहास सर्वांनीच पाहणं फार गरजेचे आहे. आपल्या इतिहासाची या चित्रपटाच्या माध्यमातून पुनरावृत्ती होत आहे. तसेच अभिनेत्री कंगना राणावत हिचे काम खूप सुंदर आहे. तिच्या कामाचे करावे तेवढे कौतुक कमी आहे, असं प्रेक्षकाने सांगितलं.

View More

खासदार कंगनाचा 'इमर्जन्सी' सिनेमा, पुणेकरांना कसा वाटला? VIDEO

तसेच अभिनेत्री कंगना राणावत व्यतिरिक्त अभिनेता अनुपम खेर, अभिनेता श्रेयस तळपदे, अभिनेता मिलिंद सोमन यांची कामदेखील कौतुकास्पद आहेत. कंगना राणावत आत्तापर्यंत तिच्या हटके आणि दमदार भूमिकांसाठी ओळखली जाते. पुन्हा एकदा या चित्रपटात साकारलेल्या इंदिरा गांधी यांच्या भूमिकेमुळे कंगना राणावत चर्चेत आहे, असंही एका प्रेक्षकाने सांगितलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे काय? शरीराला कसा होतो फायदा? Video
सर्व पहा

या चित्रपटात अभिनयासोबतच, निर्मात्याच्या आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेत देखील कंगना राणावत झळकत आहे. तसेच अभिनेता अनुपम खेर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. 1975 ते 1977 या काळात भारतात लागू झालेल्या आणीबाणीचा इतिहास प्रेक्षकांसमोर उलगडणार असून अनेक प्रेक्षक हा इतिहास पाहण्यासाठी गर्दी करतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
कंगनाचा इमर्जन्सी सिनेमा पाहून मुंबईकर काय म्हणाले…Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल