TRENDING:

दगडूशेठ गणपतीला जया बच्चन यांनी अर्पण केले होते सोन्याचे कान, अमिताभसाठी केलेला नवस; पण तो होता काय?

Last Updated:

Jaya Bachchan : अभिनेत्री जया बच्चन यांनी एकदा बाप्पाला सोन्याचे कान अर्पण केले होते. त्यांनी त्यांचे पती अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासाठी नवस केला होता. काय होता तो नवस.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मुंबईतील सिद्धिविनायक किंवा लालबागचा राजा जितका प्रसिद्ध आहे, तितकाच पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीही भक्तांसाठी आस्था आणि श्रद्धेचे केंद्र आहे. या मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात.
News18
News18
advertisement

बॉलिवूड सेलिब्रेटीही या गणपतीच्या दर्शनाला येतात. अनेकांनी येथे नवस केले आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांनी एकदा बाप्पाला सोन्याचे कान अर्पण केले होते. त्यांनी त्यांचे पती अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासाठी नवस केला होता. नवस पूर्ण केल्यानंतर तो फेडण्यासाठी त्या स्वत: अमिताभ यांना घेऊन दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात गेले होते. काय होता तो नवस? जया बच्चन यांनी बाप्पाकडे नेमकं काय मागितलं होतं?

advertisement

( 'इथून चालती हो...' मुंबईत राहून गणेश विसर्जनाबद्दल बरळली अभिनेत्री, नेटकऱ्यांनी झाप-झाप झापलं! )

ही घटना 1982 सालची आहे. त्यामागचं कारण अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील मोठा अपघात होता. 1982 मध्ये बंगळुरूमध्ये कुली चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. एका मारामारीच्या सीनमध्ये खलनायकाने अमिताभ बच्चन यांच्या पोटात जबरदस्त पंच मारला. ते मागे जाऊन स्टीलच्या टेबलावर आपटले आणि गंभीर जखमी झाले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याच्या बातम्याही पसरल्या होत्या.

advertisement

72 तास मृत्यूशी झुंज

अपघातानंतर तब्बल 72 तास त्यांच्यावर ऑपरेशन होऊ शकले नाही. त्यांची प्रकृती खूपच बिघडली होती. जवळपास 2 महिने ते रुग्णालयात दाखल होते. त्यांच्या जीवासाठी संपूर्ण देशभर प्रार्थना करण्यात आली. मंदिरं, मशिदी, चर्च, गुरुद्वारे – सगळीकडे त्यांच्या आरोग्यासाठी भक्तांनी प्रार्थना केली.

advertisement

दगडूशेठ गणपतीला सोन्याचे कान अर्पण

अखेर प्रार्थना आणि उपचारांमुळे अमिताभ बच्चन बरे झाले. ते घरी परतले तेव्हा शहरभर आनंद साजरा करण्यात आला. त्यांच्या स्वागतासाठी मुंबईच्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी जमली होती.

याच काळात जया बच्चन पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पोहोचल्या. त्यांनी बाप्पाचे आभार मानले आणि सोन्याचे कान अर्पण केले. त्यानंतर ही घटना भक्तांमध्ये खूप प्रसिद्ध झाली.

advertisement

दुसऱ्या जन्माची कहाणी

आजही अमिताभ बच्चन हा अपघात आपला दुसरा जन्म मानतात. कुली चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये या अपघाताची झलक दाखवण्यात आली होती. बिग बी स्वतः अनेकदा सांगतात की, भक्तांच्या प्रार्थना आणि इच्छाशक्तीमुळे ते पुन्हा उभे राहू शकले.

मराठी बातम्या/मनोरंजन/
दगडूशेठ गणपतीला जया बच्चन यांनी अर्पण केले होते सोन्याचे कान, अमिताभसाठी केलेला नवस; पण तो होता काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल