‘झिम्मा 2’ हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झाला. सिनेमानं रिलीजच्या तीन दिवसात दमदार कमाई केली आहे. पहिल्या तीन दिवसात सिनेमानं 4.77 कोटींचा गल्ला जमवला. त्यानंतर या आकड्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. सिनेमात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
advertisement
सिनेमाला मिळणाऱ्या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे यानं प्रतिक्रिया देत म्हटलंय, 'तुमचा सिनेमा, तुम्हीच SUPERHIT केलात. आता हा पाचवा आठवडा सुद्धा तुमचाच! खूप खूप धन्यवाद!'
सिनेमातील कलाकारांनी अनेक थिएटर्सना भेटी दिल्या होत्या. अनेक ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्ड झळकले आहेत. सिनेमा पाहून प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिक्रिया संपूर्ण टीमला भारावणाऱ्या आहेत. हा भाग आधीच्या भागापेक्षा अधिक चांगला असल्याच्याही प्रतिक्रिया येत आहेत.
पहिल्या दिवशी सिनेमानं 1.01 कोटी कमावले. दुसऱ्या दिवशी 2.15 कोटी, तिसऱ्या दिवशी 5.80 कोटींची कमाई केली. तर सिनेमाची चौथ्या दिवशीची कमाई ही 7.71 कोटी, पाचव्या दिवशी 10.62 कोटी इतकी होती. झिम्मा 2 सिनेमानं रिलीज पासून आतापर्यंत एकूण 14 कोटींची कमाई केली आहे. तर याआधी आलेल्या झिम्मा सिनेमानं एकूण 13 कोटींची कमाई केली होती.