कंगनाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तिनं रावणाचं दहन करण्यासाठी धनुष्यबाण हाती घेतलं आहे. धनुष्यबाण हातात घेऊन कंगना रावणाच्या दिशेनं निशाणा लावताना दिसतेय. रावण दहन पाहण्यासाठी हजारोंच्या संस्थेनं लोकांची गर्दी पाहायला मिळाली. त्या हजारोंच्या गर्दीत अभिनेत्री कंगनानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कंगनानं मोठ्या जोशात जय श्रीरामचे नारे लगावले. त्याचप्रमाणे भारतमाता की जय अशाही घोषणा कंगनानं दिल्या.
advertisement
लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या रामलीला कार्यक्रमासाठी कंगनानं हजेरी लावली होती. पण कंगना कार्यक्रमाठिकाणी मैदानावर एक वेगळाच प्रकार घडला. कंगना मैदानावर पोहोचण्याआधीच रावणाचा पुतळा धाडकन खाली कोसळला. त्यानंतर रावणाचा पुतळा पुन्हा एकदा उभारण्यात आला आणि रामलीला संपल्यानंतर कंगनानं लंकापती रावणाचं दहन केलं.
रावण दहन करण्यासाठी कंगनानं खास साडी लुक केला होता. ऑरेंज रंगाची सुंदर साडी तिनं नेसली होती. केसात सफेद गजरा आणि गुलाबाची लाल फुल देखील माळली होती. गळ्यातील हेवी ज्वेलरीनं कंगनानं तिचा लुक पूर्ण केला होता. व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की कंगना तिची साडी सावरत धनुष्यबाणानं नेम लावण्याचा प्रयत्न करतेय. दोन वेळा तिचे प्रयत्न अयशस्वी ठरतात पण तिसऱ्या वेळी ती रावणाचं दहन करते.
कंगनाचा नुकताच चंद्रमुखी हा सिनेमा रिलीज झाला. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. त्यानंतर आता कंगना इमरजेन्सी सिनेमा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचप्रमाणे तिचा तेजस हा सिनेमा काही 27 ऑक्टोबरला रिलीज होतोय.