TRENDING:

धावत स्टेजवर आला अन् उचलून घेतलं; बॉलिवूडच्या टॉप गायिकेसोबत चाहत्याचं भयंकर कृत्य, VIDEO VIRAL

Last Updated:

Kanika Kapoor: बॉलिवूडची लोकप्रिय गायिका कनिका कपूरच्या लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मेघालयमध्ये आयोजित 'मेघाँग फेस्टिव्हल'मध्ये बॉलिवूडची लोकप्रिय गायिका कनिका कपूरच्या लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. ८ डिसेंबर रोजी झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, सार्वजनिक ठिकाणी महिला कलाकारांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
News18
News18
advertisement

चाहत्याने भर स्टेजवर कुनिकासोबत केला गैरप्रकार

व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये, कनिका कपूर गात असतानाच एक अनोळखी व्यक्ती अचानक स्टेजवर धावत येतो. तो खाली वाकतो आणि कनिकाला पाय धरून अक्षरशः उचलण्याचा प्रयत्न करताना दिसतो. सुदैवाने, तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि त्या व्यक्तीला खेचून स्टेजवरून बाजूला केले.

एवढा मोठा गोंधळ होऊनही कनिका कपूरने मात्र आपला परफॉर्मन्स एका सेकंदासाठीही थांबवला नाही. तिने पूर्णपणे शांत आणि प्रोफेशनल राहून आपले गाणे सुरू ठेवले, तिच्या या संयमाचे खूप कौतुक होत आहे. मात्र दुसरीकडे तिच्यासोबत घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तातडीने मोठा संताप व्यक्त झाला. अनेक युजर्सनी कार्यक्रमाच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर टीका केली आणि भारतात महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.

advertisement

'दम नाही का तुमच्यात?' सुरज चव्हाणवर DP दादाचा संताप, ट्रोल करणाऱ्यांनाही चांगलंच खडसावलं, पण असं घडलं काय?

देशभरातून येताएत संतप्त प्रतिक्रिया

एका युजरने लिहिले, "ज्या देशात हजारो लोकांसमोर, स्टेजवर लाईमलाईटमध्ये असलेल्या महिला सुरक्षित नाहीत, तिथे एकट्या फिरणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची काय अपेक्षा करायची?" दुसऱ्याने टीका करत म्हटले, "हा काय करण्याचा प्रयत्न करत होता? तिला उचलायचा, छेडछाड करायची की मिठी मारायची? अशा लोकांना जेलमध्ये पाठवले पाहिजे." तिसऱ्या युजरने 'वडिलांनी मुलांना महिलांचा आदर करायला शिकवावा' हीच खरी समस्या असल्याचं मत मांडलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा, कांद्याला आणि मक्याला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

कनिका कपूरने 'बेबी डॉल' या गाण्याने रातोरात प्रचंड प्रसिद्धी मिळवली होती. त्यानंतर 'चिट्टियाँ कलाईयाँ', 'लव्हली', 'कमली' यांसारखी तिची अनेक गाणी सुपरहिट झाली आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
धावत स्टेजवर आला अन् उचलून घेतलं; बॉलिवूडच्या टॉप गायिकेसोबत चाहत्याचं भयंकर कृत्य, VIDEO VIRAL
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल