गुलाबी रंगाची आकर्षक सजावट आणि डोळे दिपवणारे इंटिरियर
या नव्या कॅफेचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. कपिलचे चाहते आणि मित्रमंडळी त्याला या नव्या व्यवसायासाठी भरभरून शुभेच्छा देत आहेत. कपिलची पत्नी गिन्नीने काही दिवसांपूर्वीच या कॅफेची पहिली झलक शेअर केली होती. गुलाबी रंगाच्या थीममध्ये सजवलेली ही जागा पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका कंटेंट क्रिएटरने तर आपल्या व्हिडिओतून 'कॅप्स कॅफे'ची संपूर्ण सफर घडवत, तिथल्या आकर्षक गुलाबी आणि पांढऱ्या रंगांच्या सजावटीची आणि अनोख्या इंटिरियरची खास झलक दाखवली आहे. हे कॅफे लवकरच कॅनडामध्ये लोकप्रिय होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
advertisement
ना डाएट, ना जिम! तरीही कपिल शर्माने 63 दिवसात कमी केलं तब्बल 11 किलो वजन, पण कसं?
मेन्यूपेक्षा बिल पाहूनच व्हाल थक्क!
व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील मेन्यू कार्ड नीट पाहिल्यावर एक गोष्ट लगेच लक्षात येते, ती म्हणजे येथील पदार्थांच्या किमती. इथे ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीचा एकही पदार्थ दिसत नाही, ज्यामुळे हे कॅफे इतर सेलिब्रिटींच्या रेस्टॉरंट्सप्रमाणेच 'महागडे' असल्याचं बोललं जात आहे. अनेकांनी मेन्यूपेक्षा येणारं बिल पाहूनच झोप उडेल असं गमतीने म्हटलंय.
गिन्नी चतरथने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर 'कॅप्स कॅफे'चे अनेक सुंदर फोटो शेअर केले होते. कपिलचे 'द कपिल शर्मा शो'मधील सहकलाकार किकू शारदा, बलराज सियाल आणि इतर मित्रमंडळींनी त्याला या नव्या व्यवसायासाठी मनापासून अभिनंदन केलं आहे.
'कॅप्स कॅफे'च्या माध्यमातून कपिल शर्माने आता कॅनडामध्येही आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली आहे. सध्या कपिल 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या तिसऱ्या सीझनमध्ये सूत्रसंचालन करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका एपिसोडमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह ऋषभ पंत, युजवेंद्र चहल आणि अभिषेक शर्मा हे क्रिकेटपटूही उपस्थित होते. यावेळी गौतम गंभीरची वेगळी, मजेदार बाजू पाहून सर्वांनाच सुखद धक्का बसला आहे. आता कपिल कॉमेडीसोबतच हॉटेल व्यवसायातही किती यशस्वी होतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे.