ना डाएट, ना जिम! तरीही कपिल शर्माने 63 दिवसात कमी केलं तब्बल 11 किलो वजन, पण कसं?

Last Updated:
Kapil Sharma Transformation : नेटफ्लिक्सवरील 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये कपिलचा बदललेला लूक पाहून त्याचे चाहते आणि फिटनेस एक्सपर्ट्सही थक्क झाले. अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, कपिलने हे कमाल ट्रान्सफॉर्मेशन कसं केलं?
1/9
मुंबई: अभिनेता कपिल शर्माला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. लहानशा गावातून आलेला हा कलाकार आज देशात कॉमेडीचा बादशाह म्हणून ओळखला जातो. मात्र सध्या त्याच्याबाबत वेगळीच चर्चा सुरू आहे. विनोदाचा बादशाह कपिल शर्मा सध्या फक्त त्याच्या कॉमेडीमुळेच नाही, तर त्याच्या जबरदस्त फिटनेसमुळेही चर्चेत आहे.

advertisement
2/9
नेटफ्लिक्सवरील 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये कपिलचा बदललेला लूक पाहून त्याचे चाहते आणि फिटनेस एक्सपर्ट्सही थक्क झाले. अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, कपिलने हे कमाल ट्रान्सफॉर्मेशन कसं केलं?

3/9
कपिलचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून कोणीही शॉक होईल. नुकतंच त्याचा फिटनेस फंडा समोर आला आहे. त्याचे फिटनेस कोच योगेश भाटेजा यांनी कपिलच्या ट्रान्सफॉर्मेशन मागचं सीक्रेट रिव्हील केलं आहे. तर हे सीक्रेट आहे सोपा पण तितकाच प्रभावी '२१-२१-२१' फिटनेस नियम.

4/9
कपिल शर्माने अवघ्या ६३ दिवसांत तब्बल ११ किलो वजन कमी केलं. त्यासाठी त्याने कोणतंही कडक डाएट केली नाही किंवा जिममध्ये तासनतास घाम गाळला नाही. त्याने एक हळू पण टिकून राहणारी पद्धत अवलंबली, ज्यात शरीर आणि मन दोन्ही बदलांसाठी तयार होतात.

5/9
नेमका काय आहे हा '२१-२१-२१' नियम? योगेश भाटेजा सांगतात की, अनेक लोक फिटनेस सुरू करतात, पण लवकरच हार मानतात. कारण ते एकाएकी खूप जास्त व्यायाम किंवा डाएट सुरू करतात. यामुळे शरीर आणि मन दोन्ही थकून जातं आणि ते रुटीन सोडून देतात. म्हणूनच, त्यांनी कपिलसाठी असा फॉर्म्युला वापरला, ज्यात दर २१ दिवसांनी एक छोटा बदल होतो. यामुळे शरीर हळूहळू फिटनेसच्या दिशेने जातं.

6/9
पहिले २१ दिवस: शरीर सक्रिय करा! - या सुरुवातीच्या टप्प्यात जिमची गरज नाही. योगेश म्हणतात,
पहिले २१ दिवस: शरीर सक्रिय करा! - या सुरुवातीच्या टप्प्यात जिमची गरज नाही. योगेश म्हणतात, "फक्त शरीरला हलवा-डुलवा. स्ट्रेचिंग किंवा साधे व्यायाम करा. तुम्ही जिलेबी खाल्ली तरी चालेल, पण शरीरला दररोज सक्रिय ठेवा. यामुळे स्नायू तयार होतात आणि शरीर मोठ्या व्यायामासाठी सज्ज होतं."
advertisement
7/9
पुढचे २१ दिवस: खाण्यावर लक्ष द्या! - या टप्प्यात खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं जातं. पण इथेही कडक नियम नाहीत. भाटेजा सांगतात,
पुढचे २१ दिवस: खाण्यावर लक्ष द्या! - या टप्प्यात खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं जातं. पण इथेही कडक नियम नाहीत. भाटेजा सांगतात, "आम्ही कपिलच्या आहारात मोठे बदल केले नाहीत. कॅलरीज मोजल्या नाहीत, कार्ब्स बंद केले नाहीत. फक्त काय खात आहोत आणि थोडा समतोल कसा राखायचा, यावर लक्ष दिलं."
advertisement
8/9
शेवटचे २१ दिवस: मानसिक आणि भावनिक फिटनेस! - अंतिम २१ दिवस मानसिक आरोग्यासाठी असतात. या काळात वाईट सवयी (जसे की सिगारेट, दारू किंवा जास्त कॅफिन) ओळखल्या जातात आणि त्यापासून दूर राहायला सुरुवात केली जाते. कोच म्हणतात की, ४२ दिवसांनंतर तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवतो आणि मग आणखी सुधारण्याची इच्छा होते. हीच योग्य वेळ असते जेव्हा तुम्ही वाईट सवयी सोडण्याचा ठाम निर्णय घेऊ शकता.

9/9
योगेश भाटेजांना वाटतं की, ही पद्धत नव्याने फिटनेस सुरू करणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. यात ना अचानक फिटनेसचा ताण येतो, ना मनावर जास्त भार पडतो. ६३ दिवसांनंतर त्या व्यक्तीला वेगळ्या प्रेरणेची गरज नसते, कारण शरीरातील बदलच त्याला प्रोत्साहन देतात. कपिल शर्माच्या प्रवासातून प्रेरणा घेऊन तुम्हीही हा सोपा नियम वापरून आपल्या आरोग्यासाठी एक चांगला बदल करू शकता.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement