बिग बींना म्हणाला,"मला नियम माहिती आहेत, समजावत बसू नका”
बिग बी यांनी केबीसीच्या मंचावर जेव्हा इशितला प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा तो मेगास्टारला म्हणाला,"मला नियम माहिती आहेत, समजावत बसू नका.” नंतर जेव्हा बिग बी प्रश्न विचारू लागले, तेव्हा पर्याय देण्यापूर्वीच इशितने उत्तर लॉक करण्यासाठी सांगितले. तो आत्मविश्वासाने वागत होता. पण लोकांनी या वागणुकीला उद्धट म्हटले. नंतर कठीण प्रश्न आल्यावर इशितने बिग बींना म्हणाले ऑप्शन देण्यास सांगितले आणि नंतर उत्तर देताना म्हणाला, "सर, एक काय, त्यात 4 लॉक लावा, पण लॉक करा". परंतु इशितचे उत्तर चुकीचे ठरले आणि तो पैसे न घेता निघून गेला.
advertisement
Bigg Boss 19 मध्ये सलमान खानने दिला सर्वात मोठा धक्का! मास्तरमाईंडलाच काढलं घराबाहेर
नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
इशितच्या वागणुकीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तुमच्या मुलाला ज्ञान असल्यास ठीक आहे, पण त्यात शिष्टाचार नसेल किंवा तो मोठ्यांच्या समोर बोलायला शिकला नसेल तर तो कधीही यशस्वी होऊ शकणार नाही, मी अमिताभ बच्चन यांच्या जागी असतो तर त्याला दोन थप्पड मारल्या असत्या, हरला ते योग्यच झालं, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
अमिताभ बच्चन यांनी विचारलेला प्रश्न काय होता?
अमिताभ बच्चन यांनी वाल्मिकी रामायणाशी संबंधित प्रश्न विचारला होता.'वाल्मिकी रामायणाच्या प्रथम कांडाचं नाव काय आहे?'
पर्याय होते:
अ. बाल कांड
ब. अयोध्या कांड
क. किष्किंधा कांड
ड. युद्ध कांड
इशितने अयोध्या कांडा लॉक करण्यास सांगितलं होतं. पण या प्रश्नाचं अचूक उत्तर हे बाल कांड असं होतं. 25,000 रुपयांसाठीचा हा प्रश्न होता. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. बोलण्यासारखं काही नाही, अशी कॅप्शन त्यांनी लिहिली आहे.