TRENDING:

KBC 17: नांदेडच्या शेतकऱ्याने एकही लाइफलाइन न घेता जिंकले 50 लाख! पण का घ्यावी लागली 1 कोटीच्या प्रश्नावर माघार

Last Updated:

KBC 17 मध्ये कैलाश रामभाऊ कुंटेवाड यांनी अमिताभ बच्चनसमोर 14 प्रश्नांची उत्तरे देत 50 लाख रुपये जिंकले, लाइफलाइनशिवाय बहुतेक प्रश्न सोडवले. पण 1 कोटींच्या प्रश्नावर त्यांना हार मानावी लागली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती 17' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये नेहमीच वेगळे स्पर्धक येत असतात. या क्विझ गेम शोमध्ये स्पर्धक आपल्या ज्ञानाचा वापर करून लाखो रुपये जिंकतात. मंगळवारच्या भागात महाराष्ट्रातील शेतकरी असलेले कैलाश रामभाऊ कुंटेवाड हॉट सीटवर बसले होते.  त्यांनी १४ प्रश्नांची अचूक उत्तरे देत तब्बल 50 लाख रुपये जिंकले. कौतुकाची गोष्ट म्हणजे या प्रश्नांची उत्तर देताना त्यांनी एकही लाइफलाइन वापरली नाही.
News18
News18
advertisement

"कौन बनेगा करोडपती" अमिताभ यांनी कैलाश यांची ओळख करून दिली. ते म्हणाले, कैलाश रामभाऊ व्यवसायाने शेतकरी आहेत, परंतु त्यांना क्रिकेटमध्ये खूप रस आहे. ते महिन्याला तीन हजार रुपये कमावतात.  त्यांना दोन मुले आहेत ज्यांना ते क्रिकेटर बनवू इच्छितात. त्यांच्याकडे त्यांच्या मुलांना क्रिकेटमध्ये पाठिंबा देण्यासाठी पुरेसे साधन नाही. त्यांना मिळालेल्या पैशातून ते त्यांच्या मुलांना क्रिकेट अकादमीत पाठवू इच्छितात.

advertisement

( हिंदी सिनेमाचा सुपरहिट कॉमेडियन, ज्याला घाबरायचे मोठे हिरो; कॅमियोसाठी घ्यायचा तगडी फी )

लाईफलाईनशिवाय 10 प्रश्नांची अचूक उत्तरं 

सोमवारच्या भागात कैलाश रामभाऊंनी 10 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. या प्रश्नांची उत्तर देताना त्यांनी एकही लाइफलाइन वापरली नाही.  मंगळवारचा भाग 11 व्या प्रश्नाने सुरू झाला. या प्रश्नाची किंमत 7.50 लाख होती. कैलाश रामभाऊ बरोबर उत्तर देतात. त्यानंतर बाराव्या प्रश्नासाठी ते ऑडियन पोल ही लाइफलाइन वापरतात आणि जनतेवर विश्वास ठेवून योग्य उत्तर देतो.

advertisement

कैलाश रामभाऊ 13 व्या प्रश्नावर ते थोडे गोंधळले. पण जोखीम घेत आणि चार पर्यायांपैकी एक निवडतात आणि उत्तर बरोबर येतं. त्यानंतर ते 14 व्या प्रश्नाकडे येतात ज्याचं उत्तर देत कैलाश 50 लाख जिंकले.

1 कोटीच्या प्रश्नावर माघार 

अमिताभ बच्चन कैलाश यांना 15वा प्रश्न वाचतात. जो १ कोटीचा असतो. कैलाश रामभाऊ लाफलाइन वापरतात. पण तरीही उत्तराबद्दल अनिश्चित असल्याने ते पुन्हा 50-50 लाइफलाइन वापतात. पण तरीही त्यांना योग्य उत्तर मिळत नाही.   त्यानंतर ते खेळ सोडून देतात. अशा प्रकारे ते KBC 17 मधून 50 लाख रुपये घेऊन बाहेर पडतात.

advertisement

15 वा प्रश्न कोणता होता?

राष्ट्रपती भवनात असलेल्या विवियन फोर्ब्स यांनी लिहिलेल्या "इन्व्हेन्शन ऑफ द प्रिंटिंग प्रेस" या चित्रात कोणाचे चित्रण आहे? पर्याय: ए. जोहान फस्ट, बी. विल्यम कॅक्सटन, सी. जोहान्स, डी. रिचर्ड एम. हो. बरोबर उत्तर: बी. विल्यम कॅक्सटन.

मराठी बातम्या/मनोरंजन/
KBC 17: नांदेडच्या शेतकऱ्याने एकही लाइफलाइन न घेता जिंकले 50 लाख! पण का घ्यावी लागली 1 कोटीच्या प्रश्नावर माघार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल