TRENDING:

Kiran Mane : 'भक्तडुक्कर पिलावळींनो…' किरण मानेंची पोस्ट, भाजपचा संताप; तक्रार दाखल

Last Updated:

Kiran Mane : किरण माने यांच्या फेसबुक पोस्ट विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. नाशिकमध्ये सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

प्रतिनिधी : लक्ष्मण घाटोळ

मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने नेहमीच सोशल मीडियावर राजकीय आणि सामाजिक विषयावर आपली मतं मांडत असतात. आजवर त्यांनी लिहिलेल्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. अनेकदा त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं आहे. मात्र किरण माने नेहमीच त्यांची ठाम मतं मांडताना दिसले आहेत. नेपाळमध्ये सुरू असलेल्या प्रकरणावर किरण माने यांनी त्यांचं मत मांडत एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टवरून चांगलाच गदारोळ निर्माण झाला असून किरण मानेंविरोधात भाजप आक्रमक झाली आहे.

advertisement

किरण माने यांच्या फेसबुक पोस्ट विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. नाशिकमध्ये ABVP कडून सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. किरण मानेंवर गुन्हा दाखल करत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. नेपाळ संबंधित पोस्ट करत भारतातील लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात उठाव करण्यास प्रवृत्त करणारी ही फेसबुक पोस्ट असल्याचा आरोप ABVP कडून करण्यात आला आहे.

advertisement

( पिक्चरची स्टोरी सांगत होता, एकाने रोखलं दुसऱ्याने धू धू धुतलं; पुण्याच्या थिएटरमध्ये तुफान राडा )

सागर तानाजी शेलार या 31 वर्षीय व्यक्तीकडून ही तक्रार करण्यात आली. त्याने केलेल्या तक्रारीत असं म्हटलं आहे की, किरण माने याने आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर एक अत्यंत आक्षेपार्ह मानहानीकारक आणि समाजात तेढ निर्माण करणारी तसेच भारतातील लोकशाही व्यवस्थेला आव्हान देणारी पोस्ट केली आहे, जी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, माननीय गृहमंत्री श्री. अमित शाह आणि महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आहे. तसेच भारतातील लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात उठाव करण्यास प्रवृत्त करणारी आहे.या पोस्टमध्ये देशातील एका वैचारिक नेतृत्वाची तुलना कुख्यात गुन्हेगार रंगा-बिल्ला यांच्याशी करण्यात आली आहे आणि एका समाजाला उल्लेखून 'अनाजीपंत' असा करून अवमानकारक टिप्पणी करण्यात आली आहे. हा मजकूर अत्यंत अपमानास्पद असून त्यामध्ये देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावरील व्यक्तींचा मानहानीकारक उल्लेख करण्यात आला आहे. जनतेत द्वेष, असंतोष आणि राजकीय गटांमध्ये वैमनस्य निर्माण करण्याची शक्यता आहे. सामाजिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा धोका आहे.

advertisement

किरण माने यांची पोस्ट काय

किरण माने यांनी 9 सप्टेंबर रोजी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी लिहिलंय, "भक्तडुक्कर पिलावळींनो, नेपाळ बघताय नं? आपल्याकडे फरक इतकाच असेल की, रंगा बिल्ला अनाजीपंतासोबत तुम्हीही पिसले जाणार. सुट्टी नॉट"

advertisement

किरण माने यांच्या पोस्टवरून वादंग निर्माण झाला आहे. दरम्यान आता यावर किरण माने यांच्याविरोधात कारवाई केली जाणार का? किरण माने यांची यावर काय प्रतिक्रिया आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Kiran Mane : 'भक्तडुक्कर पिलावळींनो…' किरण मानेंची पोस्ट, भाजपचा संताप; तक्रार दाखल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल