अमरावती : अमरावतीमधील विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीच्या प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे वार्षिक स्नेहसंमेलन एन्जॉय 2025 सुरू आहे. त्याच स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि चला हवा येऊ द्या फेम अभिनेता कुशल बद्रिके आलेले होते. त्या कार्यक्रमात बोलत असताना कुशल बद्रिके यांनी आपल्या जीवनातील विविध किस्से विद्यार्थ्यांबरोबर शेअर केले. त्यात त्यांनी मी कला क्षेत्राकडे कसा वळलो याबाबतचा एक किस्सा सांगितला.
advertisement
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अभिनेता कुशल बद्रिके यांनी सांगितले की, मी 11 वी 12 चे शिक्षण हे कॉमर्समधून घेतले. तेव्हा आम्हाला SP (Secretarial Practice) हा विषय होता. तो विषय घेण्यासाठी गबाळे सर होते. ते लेक्चर घेताना अर्धा वेळ बोलायचे आणि अर्धा वेळ त्यांच्याच कामात असायचे. त्यांच्या लेक्चरला मला असे लक्षात आले की, माझा जन्म हा अभ्यासासाठी झालेलाच नाही. आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे.
Shiv Jayanti: असाही शिवप्रेमी! अवघ्या 9 वर्षांचा चिमुकला, कामगिरी पाहाल तर आवाक व्हाल!
त्यानंतर कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये मी जेव्हा पार्टीसिपेट केलं. तेव्हा पूर्ण कॉलेज मला ओळखायला लागलं होतं. तेव्हा लक्षात आलं की, हे काहीतरी वेगळं आहे. यात आपण थोडं लक्ष द्यायला पाहिजे. त्यानंतर मी कॉमर्समधून ग्रॅज्युएशन केलं आणि नंतर पुन्हा आर्टला ऍडमिशन घेतली. याचे कारण हेच की, कॉलेजमध्ये ज्या एकांकिका होतात त्या मला करता यायला पाहिजेत.
त्यानंतर मी 50 च्या वर एकपात्री अभिनय स्पर्धा केल्यात. तेव्हा काहीच होत नसल्याने पाहून माझा विचार बदलला आणि मी नोकरी करण्याचा विचार केला. अशातच माझ्या मामांनी एकपात्री अभिनयासाठी फॉर्म भरला होता. पण, ते घाबरले आणि स्पर्धेला जाण्यास नकार दिला. मग त्यांनी भरलेले पैसे वाया जाऊ नये, म्हणून मी स्पर्धेत भाग घेतला आणि त्यात माझा पहिला क्रमांक आला. ती एक स्पर्धा अशी होती ज्यामुळे माझं आयुष्य बदलून गेलं. ते कसं? तर त्याच स्पर्धेला सिद्धार्थ जाधव सुद्धा आला होता. त्यात माझा पहिला आणि सिद्धार्थचा दुसरा क्रमांक आला होता. तेव्हा सिद्धार्थ जाधव मला म्हटला की, मी तर तुझा अभिनय बघितला नाही. पण, पहिला क्रमांक आलाय तर एका नाटकाचे ऑडिशन सुरू आहेत, तर तू ये ऑडिशनला.
मी ऑडिशनला गेलो आणि त्यात माझं सिलेक्शन झालं. तेव्हापासून माझा प्रवास सुरू झाला. त्या एकपात्री अभिनयाचे सर्टिफिकेट मी सन्मान मोहिते या नावाने घेतलेलं आहे. पण त्यात करिअर मात्र घडलं, असे कुशल यांनी सांगितले.





