अग्निशमनदलाच्या कर्मचारी वेळेत पोहोचल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. स्वर्गीय अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या फ्लॅटला शॉट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती अग्निशमनदलाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. फ्लॅट सुनंदा सदाशिव अमरापुर यांच्या नावाने असलेल्या या फ्लॅटमध्ये एक भाडेकरू राहत होत्या. ज्योती भोर पठाणे असं त्या भाडेकरूचं नाव आहे. आगीत ज्योती भोर पठाणे या भाडेकरू किरकोळ जखमी झाल्या आहेत. ज्योती या फ्लॅटमध्ये अडकल्या होत्या. त्यांना अग्निशमनदलाच्या दवानांकडून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
advertisement
हेही वाचा - 11 महिन्यात तिसऱ्यांदा तोंड लपवून वैष्णो देवीला पोहोचला शाहरूख; Video व्हायरल
अग्निशमनदलाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सुनंदा सदाशिव अमरापुर या फ्लॅटला आज ( मंगळवार ) दुपारी पावणे दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. माहिती मिळताच अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या आगीत मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. त्यामुळे पहिल्या मजल्यावर ज्योती भोर पठाणे या अडकल्या होत्या. त्यांना वाचवण्यात आलं असून त्यांच्या पायाला किरकोळ मार लागल्यानं त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी आपल्या दमदार खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे अनेक सिनेमे आजही तितक्यात आवडीनं पाहिले जातात. 2014साली सदाशिव अमरापूरकर यांचं वयाच्या 64व्या वर्षी निधन झालं. त्यांना फुफ्फुसासंबंधी आजार झाला होता. 3 नोव्हेंबर 2014 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.