‘आशा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अंतिम फेरीतील चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तसेच, अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, उषा नाईक यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार आणि दिग्दर्शक दीपक पाटील यांना अंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले.
Dahihandi 2025: गोविंदा आला रे! मुंबईतील महिला गोविंदा पथक, यंदा लावणार इतके थर
advertisement
आशा’ – एक सामाजिक भान असलेली कलाकृती
‘आशा’ चित्रपटात रिंकू राजगुरू हिने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटातून आशा सेविकांचे वास्तव, त्यांचा संघर्ष आणि सामाजिक परिस्थिती समोर ठेवण्यात आले आहे. उषा नाईक यांच्या सहायक भूमिकेनेही चित्रपटाला एक वेगळी खोली दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक पाटील आणि निर्माती दैवता पाटील यांनी लोकल 18 सोबत संवाद साधताना या चित्रपटामागचा तीन वर्षांचा प्रवास उलगडला.
आशा म्हणजे समाजासाठीचा आवाज
“आशा हा चित्रपट केवळ एका विशिष्ट गटाबाबत नाही, तर तो घराबाहेर पडून संपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळत समाजासाठी कार्य करणाऱ्या दहा लाखांहून अधिक आशा सेविकांची कहाणी आहे. या स्त्रियांच्या जीवनातल्या संघर्षांना, त्यांच्या व्यथा आणि भावना मांडण्यासाठी आम्ही मोठ्या पडद्याचा आधार घेतला. याआधी त्यांच्या जीवनावर डॉक्युमेंटरी झाली, मात्र आम्हाला वाटलं की त्यांच्या अनुभवांना व्यापक पोहोच मिळायला हवी. त्यामुळेच आम्ही तीन वर्षे रिसर्च करत, प्रत्यक्ष आशा सेविकांशी संवाद साधत हा चित्रपट साकारला. आज आम्हाला मिळालेल्या या चार पुरस्कारांमुळे त्यांचा आवाज अधिक व्यापक पातळीवर पोहोचेल, हीच खरी प्रेरणा आहे,” असे दिग्ददर्शक दीपक पाटील म्हणाले.
ही बाईपणाची गोष्ट आहे
हा चित्रपट म्हणजे ‘बाईपणाची गोष्ट’ आहे. एक स्त्री जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा ती फक्त नोकरी करत नाही, तर तिच्या वाटेतील असंख्य अडथळ्यांना तोंड देत असते. आशा सेविका या आपल्या आरोग्य व्यवस्थेचा गाभा आहेत, पण त्यांचं योगदान कधी समोर येत नाही. त्यांची सेवा ‘मुक सेवा’ आहे. आम्हाला वाटलं की त्यांचं जीवन मोठ्या पडद्यावर मांडल्याने समाजात त्यांच्याबद्दल जागरुकता निर्माण होईल. आज जेव्हा आम्हाला या पुरस्कारांच्या माध्यमातून एवढा मोठा सन्मान मिळतो आहे, तेव्हा आम्हाला असं वाटतं की त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने 'आशा' निर्माण झाली आहे,” असं निर्माती दैवता पाटील म्हणाल्या.





