सोनी मराठीच्या 'MHJ Unplugged'मध्ये अमित फाळके यांनी प्रियदर्शिनी इंदलकरला बोलतं केलं. यावेळी अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील एक थरारक क्षण शेअर केला. प्रियदर्शिनी इंदलकर आईसोबत पुण्यावरुन साताऱ्याला जात होती. तेव्हा वळुंजच्या जवळ 150 च्या स्पीडला गाडी डिव्हायडरला धडकली. टायर फुटला. काटा 150 ला अडकला. प्रियदर्शिनी गाडीत आडवी झोपल्याने गाडी धडकल्यानंतर ती खाली पडली आणि तिच्या पोटाला लागलं. रक्तस्त्राव सुरू झाला. हाता फ्रॅक्चर झाला. अभिनेत्रीची आई मात्र खूप गंभीर जखमी झाली होती.
advertisement
Bharti Singh : दुसऱ्यांदा प्रेग्नंट पण मुलाच्या जन्माआधीच वैतागली भारती, म्हणाली, 'ये बच्चा...' VIDEO
प्रियदर्शिनीच्या 'रिबर्थ मार्क'ची कहाणी
प्रियदर्शिनी म्हणते,"मला गाडीतून काढून रस्त्यावर झोपवलं होतं. खूप लोक जमलेले आठवत आहेत. पण त्यावेळी मी माझ्या आईला वाचवा, आईला वाचवा असं ओरडत होते. त्या अवस्थेत मी त्या लोकांना घरचा नंबरही सांगितला होता. त्यावेळी नेमका आजी-आजोबांनी तो फोन उचलला. त्यांची अवस्था खराब झाली. त्यानंतर इतर कुटुंबिय हॉस्पिटलमध्ये आले. माझ्या पोटात दुखत असल्याने डॉक्टरांनी माझी सोनाग्राफी केली आणि तेव्हा कळलं की मी जास्त क्रिटिकल आहे. माझं HBs 3 की 4 झालं होतं. डॉक्टरांनी योग्य उपचार केल्याने माझा जीव वाचला. त्यामुळे माझ्या शरीरावरचा मार्क हा रिबर्थ मार्क आहे".
प्रियदर्शिनी इंदलकर ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली. फुलराणी, सोयरिक, नवरदेव बीएससी, अॅग्री, दशावतार अशा अनेक चित्रपटांत तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या थिएटर गाजवणाऱ्या 'दशावतार' या चित्रपटातील प्रियदर्शिनीच्या कामाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.