चांदीचं नाणं मिळाल्यानंतर न्यूज 18 मराठीसोबत बोलताना महेश कोठारे म्हणाले,"नशीबवान' मालिकेच्या पत्रकार परिषदेदरम्यान उपस्थित सर्व मंडळींना उकडीचे मोदक वाटले. यातील एका मोदकात फक्त चांदीचं नाणं होतं. हे चांदीचं नाणं ज्याला मिळेल तो 'नशीबवान' असा हा पब्लिसिटीचा प्रकार होता. सर्वांप्रमाणे मीदेखील एक मोदक उचलला आणि नेमकं माझ्याच मोदकात चांदीचं नाणं मिळालं. हा खरेतर योगायोग ठरला. हे चांदीचं नाणं माझ्यासाठी फक्त सिन्बॉल आहे. 'नशीबवान' हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे हे चांदीचं नाणं हे माझ्यासाठी या मालिकेचं प्रतिक ठरलं आहे".
advertisement
इटलीत लग्न करुन आलेला चर्चेत, आता 35 व्या वर्षी दिली गुडन्यूज; प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा
'नशीबवान' या मालिकेच्या माध्यामातून अभिनेता आदिनाथ कोठारे अनेक दिवसांनी छोट्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे या मालिकेची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे. यासंदर्भात बोलताना महेश कोठारे म्हणाले,"नशिबवान'मधील भूमिका आदिनाथला खूप आवडल्याने त्याने ही मालिका करण्याचा निर्णय घेतला. हा आमच्यासाठी खरंच एक खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे".
'नशीबवान' ही मालिका येत्या 15 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता प्रेक्षकांना स्टार प्रवाहवर ही मालिका पाहता येईल.