अभिनेते महेश मांजरेकर यांना त्यांच्या जुनं फर्निचर या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा अवॉर्ड त्यांना त्यांच्या फेव्हरेट हिंदी अभिनेत्रीच्या हस्ते देण्यात आला. अवॉर्ड देण्याआधी अभिनेत्रीनं मांजरेकरांचं मराठीत कौतुक केलं. त्यांना घट्ट मिठीही मारली. नटीनं मारलेल्या मिठीत मांजरेकर अवॉर्ड घ्यायलाही विसरले. महेश मांजरेकर यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
advertisement
( ढगे, ढमढेरे, ढोलके... अमृता सुभाषचं खरं आडनाव आहे तरी काय? बघा VIDEO )
महेश मांजरेकर यांना 'जुनं फर्निचर' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अवॉर्ड अभिनेत्री तब्बूच्या हस्ते देण्यात आला. त्याचा त्यांना प्रचंड आनंद झाला. तब्बू आणि महेश यांचं नातं फार जुनं आहे. दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.
तब्बूच्या हातून महेश मांजरेकर यांना अवॉर्ड देताना तब्बू देखील प्रचंड खूश होती. तिने महेश यांना एका खास पद्धतीनं हे अवॉर्ड दिलं. अवॉर्ड देण्याआधी तिनं मराठीत सुरुवात केली. नमस्कार म्हणत तिने मांजरेकरांचं कौतुक केलं. आपल्या आवडत्या मित्राला आणि कलाकाराला अवॉर्ड देताना तब्बू देखील भावुक झाली.
फिल्मफेअरच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात तब्बू मराठीत बोलतेय. तब्बू म्हणते, "नमस्कार, मी खूप खुश आहे. खूप आभार या सन्मानासाठी. मी हे अवॉर्ड अशा दिग्दर्शकाला देते आहे ज्याने मला माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा सिनेमा, महत्त्वाची भूमिका दिली." त्यानंतर तब्बूनं 'मांजरेकरsss' असं मोठ्याने नाव घेतलं.
तब्बूने मांजरेकर असं नाव घेतल्यानंतर महेश स्टेजवर पोहोचले. स्टेजवर जाताच त्यांनी तब्बूला घट्ट मिठी मारली. त्यांची ही घट्ट मिठीच त्यांच्या मैत्रीचं आणि त्यांच्यात असलेलं नातं दाखवून देतात. महेश यांना भेटून तब्बू भावुक झाली.
तब्बूच्या हस्ते अवॉर्ड घेतल्यानंतर महेश मांजरेकर म्हणाले, "मी ट्रॉफी घ्यायला विसरलो कारण मिठी ही त्यापेक्षा महत्त्वाची आहे. ट्रॉफी मिळाल्याचा आनंद आहेच पण ही जी माझी मैत्रीण आहे तिच्या हातून मिळाल्याचा आनंद जास्त आहे. माझ्या मते जगातील बेस्ट अभिनेत्री ही ( तब्बू) आहे. ती अजूनही अस्तित्व पुन्हा पाहतो. तिने जे काम केलं ते अजब आहे. ते तिचं कॉन्ट्रूब्युशन आहे. त्यानंतर ती माझ्याबरोबर काम करत नाहीये. पण आम्ही नक्कीच करणार. हिच्याबरोबर काम केल्याशिवाय मी मरणार नाही."