मलायका अरोरा शुटींगला जात असताना पापाराझींनी तिला फोटो पोझसाठी थांबवलं. तितक्यात एक दिव्यांग चाहता मलायकाबरोबर सेल्फी घेण्यासाठी आला. मलायकानं देखील त्याला फोटो काढायला परवानगी दिली. तो मलायकाजवळ गेला आणि त्यानं क्षणात मलायकाच्या कंबरेवर हात ठेवला. त्या दिव्यांग चाहत्यांनं केलेली ही कृती पाहून पापाराझी देखील चकीत झाले. हा क्षण कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
advertisement
हेही वाचा - VIDEO : 'तो सर्वात भीतीदायक क्षण...' प्रसिद्ध अभिनेत्रीचा भयंकर अपघात; शूटिंगदरम्यान केसांना लागली आग
याच दरम्यान मलायकाबरोबर तिचे बॉडीगार्ड देखील होते. बॉडीगार्ड सतत तिच्या आजूबाजूला असतात. मात्र या चाहत्यानं काही क्षणात केलेल्या कृतीला बॉडीगार्ड देखील काहीच करू शकला नाही. चाहत्यानं मलायकाच्या कंबरेवर हात ठेवल्याचं लांबून पाहिल्यानंतर बॉडीगार्डला चांगलाच शॉक बसला. त्यानं हे सगळं पाहून ओरडायलाच सुरूवात केली. व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, चाहता मलायकाच्या जवळ जाऊन तिच्या कंबरेवर हात ठेवताच मागून एक गार्ड येतो आणि त्याचा हात मलायकच्या कंबरेपासून दूर करतो आणि त्यालाही बाजूला घेऊन जातो.
मलायकाचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी दणकून कमेंट्स केल्या आहेत. काही संमिश्र प्रतिक्रिया यावर पाहायला मिळत आहे. काहींनी मलायकाच्या माणूसकीचं कौतुक केलं आहे. तर काहींनी मलायकाच्या बॉडीगार्डच्या रिअँक्शनवर कमेंट्स केल्या आहेत. मलायकापेक्षा बॉडीगार्डच भाव खाऊन गेला असं अनेकांनी म्हटलं आहे.तर काहींनी मलायकाच्या बॉडीगार्डच्या रिअँक्शनवर कमेंट्स केल्या आहेत. मलायकापेक्षा बॉडीगार्डच भाव खाऊन गेला असं अनेकांनी म्हटलं आहे. तर काहींनी मलायकाच्या या वागण्यामुळे तिच्याबद्दल असलेला आदर आणखी वाढला आहे असं म्हटलं आहे.