VIDEO : 'तो सर्वात भीतीदायक क्षण...' प्रसिद्ध अभिनेत्रीचा भयंकर अपघात; शूटिंगदरम्यान केसांना लागली आग

Last Updated:

एका अभिनेत्रीसोबत एक भयानक अपघात घडला. या अभिनेत्रीच्या केसांना आग लागली आहे. ज्याचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीचा भयानक अपघात; शूटिंगदरम्यान केसांनाच लागली आग
प्रसिद्ध अभिनेत्रीचा भयानक अपघात; शूटिंगदरम्यान केसांनाच लागली आग
मुंबई, 19 डिसेंबर :   मालिकांच्या सेटवर नेहमीच छोटे मोठे अपघात घडत असतात. पण यावेळी एका अभिनेत्रीसोबत एक भयानक अपघात घडला. या अभिनेत्रीच्या केसांना आग लागली आहे. ज्याचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओत अभिनेत्रीसोबत घडलेली भयानक घटना दिसत आहे. ही अभिनेत्री आहे छवी मित्तल. अभिनेत्री छावी मित्तल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक क्षणाची माहिती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिच्यासोबत एक भयानक घटना घडलेली दिसत आहे.
छवी मित्तल गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. यापूर्वी ती तिच्या आजारपणामुळे चर्चेत आली होती. आता ती तिच्या दैनंदिन जीवनामुळे चर्चेत आहे. छवी मित्तलला काही वर्षांपूर्वी कॅन्सरने गाठलं होतं. पण या अभिनेत्रीनं ब्रेस्ट कॅन्सरवर यशस्वीपणे मात करत आता पुनरागमन केलं आहे. छवी फक्त अभिनेत्रीच नसून फेमस युट्युबर देखील आहे. आता तिने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या केसांना आग लागलेली दिसत आहे. याशिवाय छवीने व्हिडिओमध्ये हेल्थ अपडेटही दिली आहे.
advertisement
'तिथं प्रत्येक गोष्ट तपासतात...' किंग खानच्या मन्नत मध्ये आहे विमानतळासारखी तगडी सुरक्षा; डंकी फेम अभिनेत्याचा खुलासा
छवी मित्तल शूटिंगसाठी सेटवर गेली होती. यावेळी ती आपल्या पतीशी बोलत असताना अचानक तिच्या केसांना आग लागली. यावेळी अभिनेता करण वीर ग्रोवरही उपस्थित होता. पण आग लागल्याचं सगळ्यांना वेळीच लक्षात आलं आणि अभिनेत्रीच्या केसांना लागलेली आग वेळेतच विझवण्यात आली. पण या सगळ्यात अभिनेत्रीचे केस मात्र जळाले आहेत.
advertisement
advertisement
हा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'सेटवर अपघात होतात, पण माझ्या केसांना आग लागणे ही सर्वात भयंकर घटना होती!!आधी आम्हाला सगळ्यांना काहीतरी जळत असल्याचा वास आला.मग माझ्या पाठीमागे एक मेणबत्ती असल्याचं लक्षात आलं. मी थोडे पुढे गेले पण तोपर्यंत आग लागली होती आणि माझे केस जळाले. स्वतःच्या हातांनी ही आग विझवल्याबद्दल आणि मला वाचवल्याबद्दल करण वीर ग्रोव्हर तुझे खूप आभार.' अशा भावना अभिनेत्रीनं व्यक्त केल्या आहेत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
VIDEO : 'तो सर्वात भीतीदायक क्षण...' प्रसिद्ध अभिनेत्रीचा भयंकर अपघात; शूटिंगदरम्यान केसांना लागली आग
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement